चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :- तिवसा तालुका आरोग्य अधिकारी मा.डॉ.पोटपिटे मॅडम,आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.सूर्यवंशी सर व मा.डॉ.गारोळे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये व आयुर्वेदिक दवाखाना च्या वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.माहुलकर मॅडम तसेच आरोग्य निरीक्षक मा.बाबरे सर यांच्या नियोजनामध्ये *आरोग्यवर्धिनी उपकेंद्र वऱ्हा मार्फत आरोग्य उपनिरीक्षक श्री.आर टी.आटोळे व ( समुदाय आरोग्य अधिकारी ) कु.डॉ.दीपाली थेटे मॅडम यांनी आज दिनांक : 21/ 12/ 2023 रोजी वऱ्हा येथील गोपाल महाराज मंदिरामध्ये कॅम्पचे आयोजन करून 70 लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड काढून दिले.
आयुष्यान कार्ड अंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळतो. ग्रामीण भागातील बहुतांश कुटूंब आपलं उदरनिर्वाह मोलमजुरी करून चालवत असतात.
अशा प्रसंगी अनेक नागरिक आजरामध्ये योग्य उपचारापासून वंचित राहतात. अनेकांना खाजगी हॉस्पिटलचा खर्च झेपत नसल्याने आजराचा सामना करत आजार सहन करत राहतात
परंतु अशा गोर-गरीब नागरिकांना आयुष्यमान कार्ड मार्फत 5 लाखापर्यंत खाजगी हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार घेता येणार असल्याने हे कार्ड अनेकांच्या जीवनात *नव-संजीवनीचे* काम करत आहे.
म्हूणन प्रत्येक लाभार्थ्यांनी हे कार्ड काढून घेण्याचे आवाहन *आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे आरोग्य उपनिरीक्षक श्री.आर आटोळे व समुदाय आरोग्य अधिकारी कु डॉ.दीपाली मॅडम यांनी केले आहे.*


0 टिप्पण्या