Ticker

6/recent/ticker-posts

रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेस कडुन उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदन

 सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी मो. नं. 9730901120


रामटेक:- रामटेक विधानसभा क्षेत्रातील रामटेक तालुका, पारशिवणी तालुका तसेच मौदा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात धानाची (भात) शेती केली जाते आणि ही वेळ धानाचे पीक कापणीची वेळ असते ऐन वेळी जोरदार पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांचा तोंडातला घास अवकाळी पावसाने हिसकावलेला आहे,  तरी अधिकार्‍या मार्फत शेतीचे तातडीने पंचनामे करुन शेतकरी राजाला  नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसने केली. निखिल दा.पाटील अध्यक्ष- रामटेक विधानसभा क्षेत्र यु. कॉंग्रेस यांच्या नेतृत्वात मा. उपविभागीय अधिकारी रामटेक यांना मा. अजित सिंग सचिव भारतीय राष्ट्रीय युवक कॉंग्रेस, मा. अश्विन बैस समन्वयक नागपुर झोन युवक कॉंग्रेस, मा. असिफ शेख प्रभारी नागपुर जिल्हा ग्रामीण युवक कॉंग्रेस, मा. मिथीलेश कान्हेरे अध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामीण युवक कॉंग्रेस, यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन  देण्यात आले.  
 या प्रसंगी  स्नेहदीप वाघमारे उपाध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामीण युवक कॉंग्रेस, गौरव भोयर महासचिव नागपूर जिल्हा ग्रामीण युवक कॉंग्रेस, रोहित बर्वे सचिव नागपुर जिल्हा ग्रामीण युवक कॉंग्रेस, अजय कापसिकर युवक कॉंग्रेस, कासिम शेख महासचिव नागपूर जिल्हा ग्रामीण युवक कॉंग्रेस, ज्ञानी रोहनकर महासचिव रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेस, अभिषेक किम्मतकर अध्यक्ष रामटेक शहर युवक कॉंग्रेस, आदील मालाधरी कार्याध्यक्ष रामटेक शहर युवक कॉंग्रेस, शुभम वाघमारे सोसल मीडिया प्रमुख रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेस, जावेद खान, येश यादव प्रमोद कडु, आदी युवक कॉंग्रेसचे  पदाधिकारी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या