Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शीव (सायन) रुग्णालयात भेट


सोनू क्षेत्रे जिल्हा प्रतिनिधी ठाणे मो.9834081563


 ठाणे :- लोकमान्य टिळक रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय सेवेचा आढावा घेतला. ट्रॉमा केअर तसेच सामान्य कक्षातील रुग्णांची विचारपूस करुन औषधोपचाराची माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. रुग्णालयाच्या स्वयंपाकगृहाला भेट देऊन तेथील अन्नपदार्थांचीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाहणी केली.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या शुभारंभापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमान्य टिळक रुग्णालय परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या