• लाखनी येथील घटना
• जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर १० ते १२ च्या संख्येत असलेल्या मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्याने वयोवृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी(ता.७) सकाळी ६:०० वाजता चे सुमारास घडली. जाधव नंदेश्वर(६५) प्रभाग क्रमांक १४ लाखनी असे आहे. त्यांचेवर सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचार सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिवाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे प्रकृती ठणठणीत राहावी. या करिता आबालवृद्धांपासून महिला व युवकही पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर पायी फिरणे पसंत करतात. जाधव नंदेश्वर प्रभाग क्रमांक १४ तलाव वार्ड परिसरातील रहिवासी असून सकाळी पायी फिरायला जाणे हा त्यांचा नित्यनेम होता. आजही सकाळी झोपेतून उठल्यानंतर ते फिरायला गेले होते. दरम्यान रस्त्यात असलेल्या १० ते १२ संख्येने असलेल्या मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना गंभीर जखमी करत असतानाच रस्त्याने फिरणारे इतर नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी त्या कुत्र्यांना हुसकावून लावले तथा घटनेची माहिती नगरसेवक सचिन भैसारे यांना दिली. सचिन भैसारे यांनी नागरिकांच्या मदतीने जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नगर पंचायतने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.
0 टिप्पण्या