Ticker

6/recent/ticker-posts

पिंपळगाव/सडक चा आठवडी बाजार महामार्गावर

• ग्रामपंचायती मार्फत सोयी सुविधांचां अभाव 

• अपघाताची शक्यता

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :-लाखनी तालुक्यातील पिंपळगाव/ सडक येथील आठवडी बाजार महामार्गावरील सर्विस रोड वर भारत असल्यामुळे बाजाराच्या दिवशी खूप गर्दी असते त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नसली तरी या आठवडी बाजारात ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे सोयी सुविधांचा अभाव आणि अपुरी जागा यामुळे आठवडी बाजार इतरत्र स्थानांतरित करावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता मदन कमाने यांनी केली आहे. 
राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या पिंपळगाव/सडक ला उड्डाण पुलाने दोन भागात विभागले असले तरी या ठिकाणी शासकीय कार्यालये व दवाखान्याची सोय असल्यामुळे १५ ते २० गावाचा नेहमीच संपर्क येतो. पण आठवडी बाजाराची सोय नसल्यामुळे लाखनी किंवा साकोली येथे जावे लागत असे. तत्कालीन सरपंच श्याम शिवणकर, ग्रामपंचायत सदस्य बाळा शिवणकर, प्रवीण दोनोडे, सामाजिक कार्यकर्ता विश्वजित लांजेवार, ग्रामपंचायत कमिटी आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने ८ ते ९वर्षापूर्वी आठवडी बाजारास सुरुवात करण्यात आली. आठवडी बाजार भरभराटीस आल्यामुळे ग्रामपंचायत लिलाव करते. लिलावाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीस वर्षाकाठी लक्षावधी रुपये आवक होत असली तरी कसलीही सुविधा केली जात नाही. तर सर्विस रोड वर बाजार असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्षभरापूर्वी आठवडी बाजाराच्या दिवशी ट्रकच्या धडकेत चीचटोला येथील एका ज्येष्ठ नागरिकांस आपला प्राण गमवावा लागला होता. जागेच्या अभावामुळे ग्राहक व विक्रेत्यांची गैरसोय होते. तर गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोर , खीसे कापुंचा सुळसुळाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्राहक व व्यापाऱ्याच्या सोयीचा विचार करून सर्विस रोड वर भरणारा आठवडी बाजार इतरत्र स्थलांतरित करून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने पायाभूत सुविधांची व्यवस्था करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता मदन कमाने यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या