कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- लाखनी येथील जिल्हा परिषद गांधी विद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक ताराबाई कडवं यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ तसेच सहाय्यक शिक्षक राजेश टेंभूर्णे यांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्यामुळे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे, शाळेचे मुख्याध्यापक रवी मेश्राम आणि विद्यालयातील शिक्षकवृंदांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमती ताराबाई कडव ह्या अनुकंपावर जिल्हा परिषद गांधी विद्यालय लाखनी येथे १७ वर्षापूर्वी प्रयोगशाळा सहाय्यक पदावर रुजू झाल्या. तर याच विद्यालयात सेवानिवृत्तही झाल्या. छोटेखानी कार्यक्रमात त्यांना सेवापूर्ती निरोप देण्यात आला. तसेच विद्यालयातील सहाय्यक शिक्षक राजेश टेंभूर्णे यांना पदोन्नती मिळाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी ताराबाई कडव हीने विद्यालयाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबाबद सविस्तर माहिती दिली. सेवापुर्ती समारंभास उत्तर देताना कार्यरत सर्व शिक्षकांनी सेवा काळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानताना त्या भावूक झाल्या होत्या. या प्रसंगी डी.एन. गिर्हेपुंजे, राजेश चोले, सशी शेंडे, प्रा. चौहान, प्रा. खोब्रागडे, मरस्कोल्हे, सरीता चोले, प्रधान, मेघा बावणे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दोनोडे, प्रास्तविक प्रा. एम. वैद्य यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद, शिक्षिकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 टिप्पण्या