आज दिनांक 6/2/2024 ला गोंदिया येथील न्यायालयात वरिष्ठ वकील पराग तिवारी यांचेवर झालेल्या अन्यायाविरोधात वकील संघ तिरोडा द्वारा वकिलांचा काम -काज बंद असून निषेध व्येक्त केला
प्रवीण शेंडे जा. संपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र राज्य
मो.9834486558
गोंदिया -प्राप्त माहिती नुसार दिनांक 5/2/2024 ला मुख्यन्यायदंङधिकारी गोंदिया यांच्या न्यायालयात स्वतः
न्यायाधीश श्री कुलकर्णी यांनी पक्षकारला वकील बदलण्याच्या गोष्टीवरून वरिष्ठ वकील पराग तिवारी यांनी विरोध दर्शवीला असता न्यायाधीश श्री कुलकर्णी यांनी संतापून विनाकारण वरिष्ठ वकील पराग तिवारी यांना कोर्टात खूब वेळ तत्काळत उभे ठेऊन त्यांच्यावर दंड ठोठावले पण वरिष्ठ वकीलांनी यांनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांची कारागृहत रवानगी करण्यात आली.
वरिष्ठ वकील श्री पराग तिवारी यांची कसलीही चूक नसताना त्यांना कोर्टात खूब वेळ ताटकळत उभे ठेऊन त्यांच्यावर दंड थोठवला व त्यांची चूक नसल्यामुळे ते दंड भरणार नाही असे विधान केल्याने त्यांची कारागृहात रवानगी रवानगी करण्यात आली हे नैसर्गिक न्यायतत्वाचे उ्लंघन असल्यामुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात आज दिनांक 6/2/2024 ला वकिलांचा काम बंद ठेवले आहे. वरिष्ठ वकील पराग तिवारी यांच्या समर्थनाथ तसेच न्यायाधीश कुलकर्णी यांच्या या निर्णयामुळे गोंदिया जिल्ह्यातील वकिलात मोठ्या प्रमाणात रोष आहे. याच संघाने तिरोडा वकील संघात नाराजी व दुःख असून त्यामुळे आज वकिलांचा एक दिवसीय कामकाज बंद पाळण्यात आला असून सदर घटनेचा निषेध म्हणून तिरोडा न्यालयातील वकिलांनी सुद्धा कामकाज बंद पडले आहे.
0 टिप्पण्या