Ticker

6/recent/ticker-posts

ग्राहक सेवा संस्थेचा जागतिक ग्राहक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला..!



सोनू संजीव क्षेत्रे 
9834081563
जिल्हा प्रतिनिधी ठाणे


ग्राहक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गितेंद्र मिर्लेकरसर यांच्या निर्देशानुसार,
 ग्राहक सेवा संस्था मुंबईच्या वतीने आज शनिवार,  दि. १६ मार्च २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता पारशी वाडी येथे  जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला मुंबई अध्यक्ष श्री. समीर नाईक, महिला अध्यक्षा सौ. सविताताई तावरे, मुंबई उपाध्यक्ष श्री. मालतेशसर हेब्बारे, घाटकोपर तालुका अध्यक्षा सौ. संगीताताई मांडे आदी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. 
   कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक सेवा संस्था मुंबईचे उपाध्यक्ष श्री मालतेश सर हेब्बारे यांच्या भाषणाने झाली. ग्राहकांची होणारी फसवणूक व पिळवणूक व त्यावरच्या उपाययोजना ह्यावर त्यांनी भाष्य केले.  तद्नंतर, महिला अध्यक्षा सौ. सविताताई तावरे ह्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत मार्गदर्शनपर भाषण केले. ह्यात त्यांनी उपस्थित महिलांना आपल्या संस्थेची माहिती देत ग्राहक चळवळ तीव्र करण्यासाठी उपस्थित महिलांना ग्राहक सेवा संस्थेमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. समारोपाच्या भाषणात मुंबई अध्यक्ष श्री समीर नाईक ह्यांनी ग्राहक दिनाचे महत्त्व व ग्राहकांचे अधिकार ह्यावर विस्तृत विवेचन केले. या कार्यक्रमाला   
सविता गुंजाळ, सुनीता वामन, अर्चना काणे,रत्ना धोडकर, कमळ दळवी, पल्लवी पोखरकर, संगीता कदम ,संगीता राऊत, राजश्री नरवडे, सुमन जाधव, पूजा गुंजाळ, संगीता वायकर, वैशाली देसाई, लक्ष्मी पोसरेकर, रत्नमाला बेडेकर, मानसी जाधव, सुनंदा गुंजाळ, संगीता सावंत, शोभा ईदोरकर, मताडे आई, सुवर्णा, निचित, सुरेखा कांबळे, सुशीला शेटे, लता गोरडे आणि इतरही महिला उपस्थित होत्या.
    तद्नंतर, महिला अध्यक्षा सौ. सविता ताई तावरे यांनी सर्व उपस्थित महिलांना गुलाब पुष्प देऊन आभार मानले. 
   ह्या कार्यक्रमाचे नियोजन  घाटकोपर तालुका अध्यक्षा सौ. संगीता ताई मांडे व श्री. सूर्यकांत (दादा) मांडे ह्यां उभयतांनी केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या