Ticker

6/recent/ticker-posts

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचा वतीने गुढीपाडवा उत्साहाने साजरा

सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज 

ठाणे :-संस्थापक अध्यक्ष श्री दीपक कांबळे सर आणि राष्ट्रीय मुख्य महासचिव श्री कमलेश शेवाळे सर यांच्या मार्गदर्शनानुसार,
 9 एप्रिल 2024 रोजी शांतीनगर असल्फा व्हिलेज ईशान्य मुंबई मध्ये  मराठी वर्षाचा पहिला सण "गुढपाडवा" उत्साहात साजरा केला. चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी त्याला भरजरी साडी, अशी स्नेहाने आनंदाची गुढी उभारून सर्वांनी पूजा केली आणि नवीन मराठी वर्षात सुरुवात करत असताना नवीन संकल्प घेऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. या शुभमुहूर्तावर उपस्थित सर्व महिलांना "पाणी वाचवा जीवन वाचवा" असा मोलाचा संदेश  देण्यात आला. पाणी हेच जीवन त्याची बचत करण्याची प्रतिज्ञा घेऊन गुढी उभारण्यात आली. उपस्थित महिलांना संचालिका सविता तावरे यांनी स्वराज्य संघटनेची माहिती आणि कार्य सांगितले. सदर कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. महिलांनी पारंपारिक खेळ व फेर धरून गाणी म्हटली. त्यानंतर महिलांना हळदीकुंकू, भेटवस्तू वाटप करण्यात आले. विजेत्या महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास संचालिका तथा मुंबई विभाग अध्यक्ष सविता तावरे, ईशान्य मुंबई उपाध्यक्ष प्रतिभा भालेराव, ईशान्य मुंबई जिल्हा सहसंघटक दिपाली तांबे आणि ईशान्य मुंबई जिल्हा सहसंपर्कप्रमुख पद्मा मलवळकर तसेच कुंदा शिंदे, रोशनी चव्हाण, ज्योती साळवी, संचिता मानकर, राजश्री घाडगे, ललिता जयराम, ईशा परब, सानिका धावडे, वंदना गाडेकर, माया वाव्हल, प्रीती विजय मेलकरी, मानसी गायकवाड, गीता विलास चौहान, विना कळंबे, संध्या गंगावणे, उज्वला मालोरे, प्रियंका सुर्वे, श्यामरती सिंग, शालन नांगरे, साक्षी करगुटकर, सविता चौधरी, ज्योती नाडे या महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या. या संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन पद्मा मलवळकर ताईंनी केले होते.  मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडवा हा सण आनंदाने संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या