Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी येथे रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी


कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 

भंडारा:- लाखनी येथील क्रांतिज्योती बहुद्देशीय संस्थेचे वतीने सम्राट चक्रवर्ती अशोक यांची जयंती, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, रमजान ईद तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चतुसुत्रिय जयंती उत्सवाचे औचित्य साधून दिनांक ११ एप्रिल २०२४ रोज गुरुवार ला सकाळी ११:०० ते ५:०० वाजता पर्यंत महाप्रज्ञा बुद्ध विहार लाखनी येथे अमन ब्लड बँक नागपूर आणि श्री. राधाकृष्णन हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट वर्धमान नगर नागपूर अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटक हाजी इकबाल भाई आकबानी यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी आपली नावे अश्विनी भिवगडे - ९८२३९९९६२५, सुरेंद्र बनसोड ९०४९६३७७०३, जयंद्र देशपांडे - ७२६३८१७३३५, राजुभाऊ गेडाम -  ९४२०३६५०४९, भास्कर कापगते - ९१४६६३६१३७, योगेश कांबळे - ९३५६११०७३५, दिलीप भिवगडे - ८०७८९७०५४५ यांचेकडे नावाची नोंदणी करावी. तसेच जास्तीत जास्त संख्येने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन क्रांतिज्योती बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अश्विनी भिवगडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या