Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी येथे भीम जलसा व कव्वालीचे आयोजन आज

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 

भंडारा:-लाखनी येथील भीम जलसा समितीचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीचे औचित्य साधून बुधवार दिनांक १० एप्रिल २०२४ सायंकाळी ६:०० वाजता समर्थ विद्यालयासमोरील पटांगणात कव्वाला प्रज्ञाकिर्ती तथा कव्वाल विकास राजा यांच्या भीमबुद्ध गीतांचा जुगलबंदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी समाजसेविका सविता बेदरकर, उद्घाटक जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, सहउद्घाटक वैद्यकिय अधिकारी डॉ. मिलिंद बोदलकर, वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, महाप्रज्ञा बुद्ध विहाराचे अध्यक्ष सुरेंद्र बनसोड, प्रमुख अतिथी आंबेडकरी वक्ता व सरकारी वकील अमरदीप चवरे, श्याम पंचवटे, डॉ. सुशांत मेश्राम, अनिरुद्ध भोयर, मनोज चवरे, प्रा. उमेश सिंगनजुडे, डॉ. सुनील हटनागर, अर्पित गुप्ता, धनंजय तिरपुडे, अनिल माटे, पुरुषोत्तम टेंभरे, नंदलाल धकाते, विशेष अतिथी नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर, नगरसेवक धनु व्यास, प्रदीप तीतिरमारे, बबलू निंबेकर, नगरसेविका ज्योती निखाडे, मुरमाडी चे सरपंच शेषराव वंजारी, सावरी चे सरपंच सचिन बागडे, मानेगाव च्या सरपंच आशा सिंगनजुडे, सेलोटी चे सरपंच सूरज निखाडे, अचल मेश्राम, सी.एम. बागडे, डॉ. धनंजय भीमटे, कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, गजेंद्र गजभिये, प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे, विठोबा कांबळे, संजय रामटेके, मंगेश चांगले, केशव रामटेके, ऍड. धनंजय बोरकर, ऍड. प्रशांत गणवीर, ऍड. स्वप्नील गायधने, ऍड. पंकज हुमने, ऍड. रविभूषण भुसारी, डॉ. महेंद्र गणवीर, डॉ. युवराज मोटघरे, प्रा. युवराज खोब्रागडे, डॉ. वैभव गणवीर, डॉ. संजय निंबेकर, ऍड. सुरेश रामटेके, ऍड. प्रमोद आठवले, गोंडेगाव चे सरपंच धर्मेंद्र बोरकर आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच १४ एप्रिल रोजी सकाळी १०:०० वाजता पासून सिंधीलाईन लाखनी येथे भोजनदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजन समिती अध्यक्ष अजित मेश्राम, उपाध्यक्ष देवानंद उके, सचिव कृपाल मेश्राम, सचिन रामटेके, सहसचिव अमित वैद्य, रक्षित कांबळे, कोषाध्यक्ष दिनेश वासनिक, धीरज गोस्वामी, सहकोषाध्यक्ष कल्याण राऊत, योगेश कांबळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या