ग्रामीण भागात चौका चौकात होत आहेत उमेदवाराबाबद चर्चा
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- ११ भंडारा गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रात प्रथम टप्प्यात होऊ घातलेल्या निवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात असून प्रचार शिगेला पोहचला असून आरोप प्रत्यारोपांच्या हैरी झडत असून स्टार प्रचारकांच्या प्रचार सभा धूम धडाक्यात होत असल्यामुळे स्थानिक पातळीवरील प्रभावी नेते व कार्यकर्ते यांचे महत्त्व कमालीचे वाढल्यामुळे भाव वधारले आहे. नेत्याचे आदेशावरून त्यांनी कामही सुरू केले आहे. ज्या व्यक्तीकडे ज्या क्षेत्राची जबाबदारी दिली असेल त्या क्षेत्रातील स्थानिक नेते मंडळींचा दररोज परिस्थितीचा जायजा घेतला जात असल्याने त्याचाही उत्साह वाढलेला दिसून येतो. नेते मंडळी बरोबरच सामाजिक कार्यकर्ते मोठे कुटुंबीय सामाजिक कार्यात रुची असलेले व्यक्तिमत्त्व यांनाही मान दिला जात असल्याचे चित्र दिसत असून यावरून कोणत्या पक्षाची स्थिती काय आहे. या बाबद मते मतांतरे व्यक्त होत आहेत. नोंदणीकृत संस्था व महिला स्वयं सहाय्यता बचत गटाकडेही विशेषत्वाने लक्ष केंद्रित केले जात आहे. स्थानिक नेते व कार्यकर्त्यांकडून आपलाच उमेदवार निवडणुकीत जिंकून यावा. या करिता मतदारांना आपलेसे करण्याचे प्रयत्न सुरू असून प्रत्येकाला खुश ठेवण्यासाठी स्थानिक नेत्यांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी प्रचार सामुग्री जसे पोस्टर, बॅनर, भोंगे, भित्ती चित्रांची संख्या कमी असल्यामुळे काही ठिकाणी निवडणुकीत निरुत्साहही दिसून येत आहे. जसजशी उन्हाची तीव्रता वाढत आहे तसतशा कार्यकर्त्यांच्या हालचालीही वाढत असल्याचे दिसून येते. मात्र शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील चौक, सार्वजनिक ठिकाणांवर रात्री उशिरा पर्यंत उमेदवाराच्या जय पराजयाच्या चर्चा रंगलेल्या असल्याचे पहावयास मिळते. काहीही असले तरी जिथपर्यंत लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. तिथपर्यंत स्थानिक कार्यकर्त्यांचे भाव वधरल्याचे चित्र दिसत आहे.
0 टिप्पण्या