सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज
ठाणे :-संस्थापक अध्यक्ष श्री दीपक कांबळे सर आणि मुख्य महासचिव श्री कमलेश शेवाळे सर यांच्या मार्गदर्शनानुसार, तसेच संचालिका सविता तावरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ७ एप्रिल 2024 रोजी एक आगळा वेगळा कार्यक्रम पार पाडण्यात आला. मुंबई विभाग संघटक वैशालीताई कांबळे यांच्या पुढाकाराने आपल्या संघटनेस पाहुणे म्हणून वसंत मालिनी आधार आश्रम या संस्थेने कल्याण येथे तृतीय पंथीयांना सक्षम करण्यासाठी शिलाई मशीन देणगी देण्यात येणार होते. त्यासाठी बोलावले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत मालिनी आधार आश्रम चे हेन्री सॅम्युअल या सरांनी केले. सर्वप्रथम शिलाई मशीनची पूजा करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वैशाली कांबळे यांनी वसंत मालिनी आधार आश्रम संस्थेबद्दल माहिती सांगितली, नंतर मुंबई विभाग प्रभारी मालतेश हेब्बारे सर यांनी स्वराज्य संघटनेबद्दल माहिती सांगितली तसेच सविता तावरे यांनी संघटना कशा प्रकारे कार्य करते याची देखील सविस्तर माहिती सांगितली. आकाश मेंगजी यांनीही आपल्या कार्याबद्दल माहिती सांगून तृतीयपंथीयांना हे भविष्यात लागणाऱ्या मदतीसाठी आम्ही नक्कीच मदत करू असे सांगितले. त्यानंतर सी एल एम संस्थेचे उदेश गायकवाड यांनीही तृतीयपंथीयांना पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी ते सक्षम आहेत अशी तयारी दाखवली. नंतर तृतीयपंथीयांचे गुरु शालिनी गुरु यांनी त्यांच्या सर्व भगिनींना या कार्यास शुभेच्छा दिल्या . त्यानंतर शिलाई काम शिकवणाऱ्या त्यांच्यापैकीच चंचला यांनी त्यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आणि शेवटी माधुरी सरोदे या वैशाली कांबळे ताई यांच्या वर्ग मैत्रीण आहेत. वैशालीताईंनी त्यांना शिलाई मशीनची मदत मिळवून देण्याच्या कामांमध्ये पूर्णपणे सहकार्य केले . अशाप्रकारे माधुरी यांनी सांगितले की अजून मशीन मिळवून एक त्यांच्यासाठी गारमेंट सुरू करून सर्वांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य त्या करणार आहेत. या कार्यक्रमास स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या संचालिका तथा मुंबई विभाग अध्यक्ष सविता तावरे, मुंबई विभाग प्रभारी मालतेश हेब्बारे सर , मुंबई विभाग संघटक वैशालीताई कांबळे, घाटकोपर तालुका कार्याध्यक्ष सिद्धार्थ गज्जेली, उल्हासनगर शहर सचिव आकाश मेंगजी आणि नव्याने संघटनेत आलेल्या कल्याण शहर सरचिटणीस उज्वला पवार तसेच वसंत मालिनी आधार आश्रम संस्थेचे हेन्री सॅम्युअल सर, राजेश लाल सर उपस्थित होते. तसेच सी एल एम संस्थेचे उदेश गायकवाड आणि सायली साळवी हे देखील उपस्थित होते. संघटनेची माहिती त्यांना सांगितल्यानंतर त्यातील काही तृतीयपंथी आपल्या संघटनेत जुडण्यास तयार आहेत. अशाप्रकारे आज एक आगळावेगळा कार्यक्रम साजरा करण्यात आला. आलेल्या संघटनांचे आभार मानत कार्यक्रम समाप्त झाला.
जय स्वराज्य!!
0 टिप्पण्या