Ticker

6/recent/ticker-posts

महायुती उमेदवाराचे प्रचार यंत्रणेत आरपीआय कार्यकर्त्यांना स्थान नाही


• आरपीआय कार्यकर्त्यांच्या खासगीत चर्चा

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 

भंडारा :- राज्यात महायुतीत भारतीय जनता पार्टीचे नेतृत्वात  १३ घटकपक्ष सहभागी असून लोकसभा निवडणूकीपूर्वी पालकमंत्री विजयकुमार गावित यांचे अध्यक्षतेखाली भंडारा हेमंत सेलिब्रेशन भंडारा येथे झालेल्या बैठकीत समान कार्यक्रम व सर्व घटकपक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सन्मान दिला जाईल. असे आश्र्वस्थ करून यात आले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारास आठवडाभराचा कालावधी लोटून सुद्धा महायुती चे उमेदवार सुनील मेंढे यांचे प्रचार यंत्रणेत आरपीआय कार्यकर्त्यांचा समावेश केला गेला नसल्याच्या आरपीआय कार्यकर्त्यांत खासगीत चर्चा होत आहेत. 
               राज्यात स्वबळावर कोणताही राजकीय अथवा प्रादेशिक पक्ष निवडणूक जिंकू शकत नाही. तसेच समोर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी च्या नेतृत्वात १३ पक्षांची महायुती स्थापन करण्यात आली. त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी(कवाडे गट) ह्या प्रादेशिक पक्षाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी व्हीके हॉटेल, हेमंत सेलिब्रेशन हॉल भंडारा येथे महायुतीत समाविष्ट सर्व घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पालकमंत्री विजयकुमार गावित यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात मित्र पक्षांना सत्ताधारी पक्षाकडून सन्मानाची वागणूक दिली जात नाही, कार्यकर्त्यांची कामे केली जात नाही, निवडणुकीपर्यंत कोणीही विचारतही नाही अशी खंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) महासचिव कैलास गेडाम यांनी व्यक्त केली होती. यास उत्तर देताना पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी या नंतर महायुतीत समाविष्ट सर्व घटक पक्षांसाठी समान विकास कार्यक्रम,  जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्यांमध्ये सर्वच घटकपक्षातील कार्यकर्त्यांचा सामावेश करण्यात येईल. असे जाहीर केले होते. भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्राची महायुतीची जागा भारतीय जनता पक्षाचे कोट्यात गेल्यामुळे विद्यमान खासदार सुनील बाबुराव मेंढे दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा यांचेकडे सादर करण्याचे दिवशी सर्व घटकपक्षातील पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर दखल घेतली गेली नाही. प्रचार सुरू होऊन आठवडाभराचा कालावधी लोटला असताना सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या पदाधिकाऱ्यांना प्रचार यंत्रणेत समाविष्ट करण्याचे सौजन्य भारतीय जनता पक्षाचे उमेदवाराने दाखविले नसल्यामुळे रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रात दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या