• सभापती प्रणाली सार्वे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- शेतकऱ्यांना शेतीसह पूरक व्यवसाय करून उन्नती साधता यावी. या करिता पंचायत समिती च्या पशू संवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय व जिल्हा परिषदेमार्फत अनेक योजना राबविल्या जातात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती प्रणाली विजय सार्वे यांनी केले आहे.
भारतीय अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असून कधी अतिवृष्टी तर कधी अवर्षणामुळे शेतकऱ्याना दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी शेती बरोबरच पूरक व्यवसायाकरिता राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण दुधाळ २/४/६ गायीचे गट वाटप तसेच नाविन्यपूर्व शेळी १० शेळ्या व १ बोकड गट वाटप त्याचप्रमाणे नावीन्यपूर्ण १ हजार मासल कुक्कुट गट वाटप, या शिवाय मराठवाडा योजना २ गायी/म्हशी, १० शेळी व १ बोकड ह्या योजना आहेत. आणि विशेष घटक योजना दुधाळ गट वाटप ७५ टक्के अनुदान, विशेष घटक योजना १०० टक्के अनुदानावर अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना खाद्य वाटप, आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी योजनेअंतर्गत १० शेळ्या व १ बोकड गट पुरवठा करणे, आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी योजनेअंतर्गत शेळी १०० टक्के अनुदानावर खाद्य वाटप, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ गट वाटप, एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम योजना, एकदिवसीय १०० पिलांचे गट वाटप तथा खाद्य वाटप, ५० टक्के अनुदानावर बोकड वाटप, जिल्हा वार्षिक योजना ५० व १०० टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटप, राष्ट्रीय पशुधन केंद्र पुरस्कृत योजना(एनएलएम) इत्यादी जिल्हा परिषदेमार्फत योजना चालविला जातात. इच्छुक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती प्रणाली विजय सार्वे यांनी केले असून अधिक माहिती करिता नाजिकच्या पशू वैद्यकिय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
ही आहेत आवश्यक कागदपत्रे
लाभार्थी अनुसूचित जाती जमाती चा असल्यास जात प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत, फोटो, ओळख पत्राची झेरॉक्स प्रत, प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत, शेतजमिनीचा ७/१२ व नमुना ८अ, सदर योजना यापूर्वी लाभ न घेतल्याचा सरपंचाचा शिफारस पत्र, अपत्याचा दाखला, रहिवासी दाखला व पासपोर्ट साइज फोटो. ही आहेत आवश्यक कागदपत्रे.
0 टिप्पण्या