रतन जाधव चित्रा न्युज
पुणे :-देशातील अनेक ठिकाणी आजही अत्र - वस्त्र - निवारा या मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना झगडावे लागत आहे महाराष्ट्रात देखील ग्रामीण भागातील मतदार नागरिक आजही विषमतेचे गरिबीचे . दारिद्र्याचे चटके सोसत आहेत . मात्र मतदानावर बहिष्कार घालण्याची ही घटना . कुठल्याही दुर्गम भागातील नाही किंवा जंगल सदृश्य अशिक्षित भागातील नाही तर ही पुण्यातील घटना आहे गेली पंधरा वर्षे आमच्या मागण्या पूर्ण करा म्हणून लिहिलेल्या शेकडो पत्रांना जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे महानगरपालिकेने केराची टोपली दाखवली . आहे . पुण्यातील कात्रज - कोदवा रोड गोकुळनगर येथील केदारेश्वर पाण्याचे टाकीजवळील गायरान जमिनीवर नाथपंथी डवरी . वडार आणि दलित समाजातील लोकांची सुमारे अडीचशे घरे आहेत येथील सर्वांच्याच जवळ गेल्या पंधरा वर्षापासून राहत असल्याचे पुरावे आहेत आणि मतदान कार्ड सुद्धा आहे शासनाच्या महत्वाच्या योजनांपैकी हागणदारी मुक गांव संकल्पना एकीकडे राबवायची आणि दुसरीकडे शौचालय बाधून देण्यासाठी सोयी सुविधा नाकारायची यामुळे महिला मतदार प्रचंड संतप्त झाल्या . आहेत पुण्यासारखी विद्वानांचे आणि शिक्षाणचे माहेरघर असलेली पुणे शहराची पुणी महानगरपालिप महिलांना शौचालय उपलब्ध करून देत नाही म्हणून गेली पंधरा वर्ष येथील मतदार नागरिक बंधू - भगिनी . त्याच्या वस्तीजवळीलच झाडाझुडपांचा अडोसा शोधून शौचास जात असत मात्र दोन दिवसांपूर्वी एका समाजकंटकाने वस्ती जवळील वस्तीजवळील सर्व झाडे तोडली आहेत सर्व झाडेझुडपे तोडून गायरान जमिनीवर कुंपण घातल्याने चा गरीब वस्तीतील महिलांनी आम्ही शौचाला जायचे कुचे असा प्रश्न विचारत आम्हाला तात्पुरती मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करून द्यावी म्हणून पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे मनपाचे उपायुक्त . सदीप कदम यांच्याशी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने अध्यक्ष उमेश चव्हाण मा सहा पोलीसआयुक आणि रुग्ण हक्क परिषदेचे प्रमुख समन्वयक मिलिंद गायकवाड परिषदेच्या पुणे शहर अध्यक्ष अपर्णा साडये मारणे अमृता जाधव सूरज तुपे यांनी पुणे मनपाअधिकाऱ्यांशी समक्ष भेटून चर्चा केली पत्र व्यवहार केला निवेदने सादर केली . पुणे मनपातील जबाबदार अधिकारी व संबंधितांनी देखील त्या ठिकाणी आम्ही तात्काळ मोबाईल टॉयलेट पाठवून देण्याची व्यवस्था करतो आणि पक्के सुलभ शौचालयाची उभारणी देखील करू असे सांगत वेळ मारून नेली आणि भारत देशातल्या सुजाण मतदार बंधू - भगिनीच्या तोंडाला पाने पुसली आहेत . महिलांनी उघड्यावर शौचाला जाणे प्रचंड लाजिरवाणे . संवेदनशील आणि गंभीर बाब असताना देखील प्रशासनाल जाग येत नाही म्हणून केदारेश्वर रहिवासी संघ कोंदवा कात्रज रोड येथील मतदारांनी13 मे 2024 रोजी होणाऱ्या एकीकडे मतदानाचा टक्का वाढवा ! म्हणणाऱ्या प्रशासनाला सोयी सुविधांच्या अभावी मनदानाचा कमी होणारा टक्का वाढवता येईल का ? हाच आता मूलभूत मोठा प्रश्न आहे .


0 टिप्पण्या