Ticker

6/recent/ticker-posts

नमस्कार मोदीजी, थोडा घबरा गये क्या ? विचारत मोदींना राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर

पाच वर्षांपासून उपस्थित करत असलेल्या अंबानी-अदानी या मुद्यावर काँग्रेसच्या शहजाद्याने बोलायचे बंद केले आहे. यामागचे कारण काँग्रेसने जनतेला सांगितले पाहिजे. शहजाद्याने हा मुद्दा उपस्थित न करण्यासाठी काही ‘डील’ केले नाही ना?असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला . त्याला तातडीने राहुल गांधी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. नमस्कार मोदीजी, थोडा घाबर गये क्या ? असे विचारत अंबानी-अदानी टेम्पो भर भरून पैसे देतात हा आपला अनुभव आहे काय ? जर आम्हाला पैसे दिले तर सीबीआय, ईडी चौकशी करा असे जाहीर आव्हान राहुल गांधींनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे.



पाच वर्षांपासून उपस्थित करत असलेल्या अंबानी-अदानी या मुद्यावर काँग्रेसच्या शहजाद्याने बोलायचे बंद केले आहे. यामागचे कारण काँग्रेसने जनतेला सांगितले पाहिजे. शहजाद्याने हा मुद्दा उपस्थित न करण्यासाठी काही ‘डील’ केले नाही ना?असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला होता . त्याला तातडीने राहुल गांधी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

तेलंगणा येथील वेमुलावाडा येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते म्हणाले की, अदानी-अंबानी यांच्याविरोधात करण्यात येणारा प्रचार काँग्रेसकडे नोटांनी भरलेला टेम्पो पोहोचल्यामुळे त्या पक्षाने बंद केला की काय? निवडणुका जाहीर झाल्यापासून अंबानी-अदानी यांच्यावर टीका करणे काँग्रेसने थांबवले आहे. अदानी-अंबानींकडून नेमके काय मिळाले हे काँग्रेसच्या शहजाद्याने तेलंगणाच्या भूमीवरून जाहीर करावे, असे आव्हानही पंतप्रधानांनी दिले. याला राहुल गांधी यांनी चोख प्रत्यूत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेस पक्षाने अदानी-अंबानी यांच्यावर टीका केली होती आणि आता एका रात्रीत ही टीका थांबली. याचा अर्थ काँग्रेस पक्षाला बहुतेक काही टेम्पो भरून ‘चोरी का माल’ मिळाला आहे. काले धन की कितनी बाेरीया भरकर रुपये मारे है असा सवालही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या