रुपाली डोंगरे चित्रा न्युज
धुळे :-मा.खासदार श्री.अशोक जी नेते यांचे निवडणूक निरीक्षक म्हणून प्रचार दौरा प्रसंगी आज दिं.०९ मे २०२४ रोज गुरुवारी जि.धुळे येथे आले असता या निमित्ताने धुळे येथील साक्री विधानसभेच्या आमदार मंजुळाताई गावित व डॉ. तुळशीराम जी गावित यांच्या निवासस्थानी भेट दिली असता यावेळी खा.नेते यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्काराने स्वागत केले.
यावेळी खा.नेते यांनी एकवीरा देवी मातेचे दर्शन व पूजाअर्चा करत मनोभावे दंडवत प्रणाम करत अनंत कोटी ब्रम्हांड स्वामिनी विश्व विजेती जगत जननी भक्त वत्सले श्री एकवीरा दैव्यै नमःभक्ती भावनेने पूजा केली.
याप्रसंगी एकवीरा मातेच्या ट्रस्टच्या मंडळानी खा.नेते यांच्यासह मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन मानसन्मान व सत्कार केला.
यावेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे,प्रदेश मिडिया सेल चे अक्षय उईके, चि.सागर गावित चि. किशोर गावित,जयश पाथोडे,उपस्थित होते.


0 टिप्पण्या