Ticker

6/recent/ticker-posts

महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा...


गावकऱ्यांनी काढली ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक...

सुजित धनवे चित्रा न्युज 
जामखेड :-  अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघ, महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्या प्रचारार्थ आ. राम शिंदे यांचा डोणगाव येथे आज दि.08/05/2024 रोजी सकाळी 10  वाजता गावातील ग्रामस्थांनी ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढून कॉर्नर सभा घेण्यात आली.
      त्यावेळी आ.राम शिंदे बोलताना म्हणाले कि, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कि खा. सुजय विखे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे. ही निवडणूक मा. नरेंद्र मोदी साहेब यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची निवडणूक आहे. आज पर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामे झाली आहेत. आणि आणखी होतीलही. आपल्या वाडिवस्तीचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर पुन्हा एकदा खा. सुजय विखे पा. यांना निवडून आणायचे आहे .
       त्यावेळी भाजपा ता. अध्यक्ष अजयदादा काशीद, सभापती शरददादा कार्ले, रविदादा सुरवसे, मा. जि. प. सदस्य सोमनाथ पाचारणे,  सरपंच बापूराव ढवळे, सरपंच लहू शिंदे,सरपंच पांडुरंग उभाळे, अशोक महारनवर, नाना आढाव, राऊत मेजर, उपसरपंच अजितदादा यादव, पोपट जमदाडे साहेब, राम नाना पवळ, मा. सरपंच दत्ता भागवत, मा. सरपंच अर्जुन यादव, ग्रा. प. सदस्य आबा पोठरे, बिभीषण पवळ, रामेश्वर यादव मेजर, भाऊसाहेब यादव, गणेश यादव, बबन मोरे, बारकू धनवे, बाळासाहेब पवळ,अशोक यादव,सोमीनाथ मोरे, निलेश वारे, प्रशांत साळवाण,जालिंदर यादव, बुवासाहेब यादव,गणेश डोंगरे, सचिन सातव, बबन नाना यादव, पांडुरंग पोठरे, विजय जमदाडे आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 सूत्रसंचालन उपसरपंच अजितदादा यादव यांनी केले, तर आभार पोपट जमदाडे यांनी मानले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या