Ticker

6/recent/ticker-posts

२१ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड येथील घटना, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद 


कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- तालुक्याच्या ठिकाणी राहायला जाऊ असे पतीला म्हणणाऱ्या पत्नीने रागाच्या भरात राहत्या घराच्या स्लॅबला असलेल्या लोखंडी कडीला ओढणीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी(ता.१७ मे) रोजी सकाळी ११:०० वाजता च्या सुमारास नांदेड येथे उघडकीस आली. मृतक विवाहितेचे नाव प्रचिता सुनिल बावनकर(२१) रा. नांदेड, तालुका लाखांदूर असे आहे. पती सुनील बावनकर यांच्या फिर्यादीवरून लाखांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
                 मृतक प्रचिताचे मागील ३ वर्षांपूर्वी गावातीलच सुनील बावनकर यांच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक दीड वर्षाचा मुलगा आहे. या प्रेमविवाहाला प्रचिताच्या कुटुंबियांचा विरोध असुन ते त्यांचे सोबत बोलत नाहीत. सुनिलने नांदेड येथील घराशेजारीच घराचे बांधकाम सुरू केले. घटनेच्या दिवशी सुनील सकाळी ७:०० वाजताच्या सुमारास प्रचिता घरी झोपली असताना घराच्या कामावर गेला होता. तो काही वेळाने प्रचीताला उठविण्यासाठी घरी आला असता प्रचिता मोबाईल हाताळतांना दिसली. त्यावेळी सुनीलने प्रचिताला स्वयंपाक करण्यास सांगितले असता तिने आपण पवनीला राहायला जाऊ असे बोलल्याने घराचे बांधकाम झाल्यावर आपण सायंकाळी पवनीला राहायला जाऊ असे सांगून सुनील पुन्हा घराच्या कामावर गेला. दुपारच्या सुमारास सुनील घरी जेवणासाठी आला असता प्रचिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. पतीने घटनेची माहिती गावकऱ्यांसह लाखांदूर पोलिसांना दिली. मृतक विवाहितेचा स्वभाव तापट असून तिने रागाच्या भरात स्वतःचे राहते घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी. ठाणेदार सचिन पवार यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाडे, निशा खोब्रागडे, पोलीस हवालदार विलास मातेरे, पोलीस अंमलदार अनिल राठोड, वाहन चालक उमेश शिवणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नातेवाईकांचे मदतीने मृतदेह खाली उतरवून उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे पाठविला. शव परिक्षणानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत तिचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या