Ticker

6/recent/ticker-posts

गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व जिवंत काडतुस सह दोघांना पकडले, (स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली ची कार्यवाही)

मोईन कादरी हिंगोली 
हिंगोली :-मा. पोलीस अधीक्षक . जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात मालाविरुध्दचे गुन्हयांना आळा घालण्याचे तसेच अवैध शस्त्र विरोधात कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने, पो.नि.विकास पाटील, स्था.गु.शा. हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.  शिवसांब घेवारे यांचे पथक काम करीत होते.

आज दिनांक १७/०५/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक वसमत शहर व ग्रामीण हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, इसम नामे पवन माणिकराव डाखोरे, वय २३ वर्ष, रा. पळसगाव, ता. वसमत व गणेश डिगांबर गुंडाळे, वय २१ वर्ष, रा. रूपला पांढरी, ता. पुर्णा, जि. परभणी, ह.मु. पाटीलनगर, वसमत हे अवैधरीत्या गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) विक्रीसाठी घेवुन फिरत आहेत व ते पळसगाव पाटीवर थांबले आहेत अशी गोपनिय माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तात्काळ पळसगाव पाटी येथे जावुन, दोन संशईतांना ताब्यात घेवुन, विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यातील एक इसम नामे पवन माणिकराव डाखोरे याने त्याचा मित्र नामे गणेश डिगांबर गुंडाळे याच्या मदतीने अवैधरीत्या गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व एक जिवंत काडतुस विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे सांगुन कमरेला लावलेले गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व बॅरेलमधील एक जिवंत काडतुस एकुण किंमती ४२,०००/- रूपयाचे काढुन दिल्यावरून सदर दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेविरूध्द पो.स्टे. वसमत ग्रामीण येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

यातील आरोपी नामे पवन माणिकराव डाखोरे, वय २३ वर्ष, रा. पळसगाव, ता. वसमत याचेवर नांदेड जिल्हयातील दोन दरोडयाचे गुन्हे दाखल असुन, तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक  जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक  अर्चना पाटील, पो.नि. विकास पाटील, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि.. शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार पांडुरंग राठोड, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या