Ticker

6/recent/ticker-posts

इज्तेमा निकाह आजच्या काळाची खरी गरज:मुफ्ती मोहम्मद साजिद

रूपाली मेश्राम चित्रा न्युज 
भंडारा:मुस्लिम लायब्ररी येथे मुस्लिम निकाह कमिटी तर्फे नुकतेच सामूहिक विवाह(इज्तेमा निकाह) चे आयोजन करण्यात आले.एकूण सहा जोडप्यांचे निकाह लावण्यात आले.निकाह ची रस्म विशेष अतिथी मुफ्ती मोहम्मद साजिद,कारी अय्युब यांनी पूर्ण केली.या प्रसंगी मुस्लिम निकाह कमिटी अध्यक्ष सैय्यद सोहेल ,मुस्लिम लायब्ररी चे अध्यक्ष नईमुरहीम खान, जुनैद अख्तर,रिजवान काजी,इरफात खान,शकीबुद्दिन खान आदी मान्यवर सहित भंडारा शहर चे गणमान्य नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुफ्ती मोहम्मद साजिद यांनी आपल्या भाषणात कुराण व इस्लाम जगातील सर्व मानवास चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देते.इज्तेमा चे उद्देश चांगल्या गोष्टी व विचारांचे निमंत्रण देणे आणि वाईट प्रवत्ती चा नाश करणे होय,सामूहिक विवाह (निकाह) समय ची गरज आहे,निकाह अत्यंत साधेपणाने,वायफळ खर्चास आळा घालून ,हुंड्या व ताम _झाम विना आणि शरीयत प्रमाणे असावे ही संपूर्ण मुस्लिम समाजाची जिम्मेदारी आहे, आई _वडिलांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण व तालीम द्यावी जेणेकरून  जिवणात भविष्यातील येणाऱ्या पिढी साठी हे उत्तम कार्य होईल असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन रिजवान काजी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुशीर अहमद,सैय्यद सोहेल अली,सोहेल मोबिन खान,सैय्यद फराज, इमरान खान तथा इतर निकाह कमेटी मेंबर,मुस्लिम लायब्ररी कमिटी ई चे सहकार्य लाभले.
मुस्लिम निकाह कमिटी सन 2007 पासून निरंतर इजतेमा निकाह चे आयोजन दर वर्षी करीत आहे. कोरोना काळात ही जेव्हा बुकिंग करण्यात आली होती तेव्हा कमिटी तर्फे त्यांच्या घरी जावून लग्न आटोपून त्यांना जिवांगर्जेच्या वस्तू,सामान सुध्धा देण्यात आले  होते_हे विशेष.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या