अर्पित वाहाणे चित्रा न्युज
वर्धा :- शहरात गेल्या अनेक दिवसांपासून बेवारस श्र्वानांचा वावर आणि हैदोस वाढल्यामुळे वर्धा शहरातील नागरिकांना मध्ये कमालीचे भितीमय वातावरण तयार झाले आहे.
रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांवर धाऊन जने असो की पादचारी नागरिकांना चावा घेणे असो या घटना वर्धा शहरात नित्य निदर्शनात येत असुन नुकतीच शहरातील महादेवपुरा येथे 60 व्यक्तींना तर तारफैल पाकीजा कॉलनी क्रोडक शाळा मैदान येथे तब्बल 150 हून अधिक नागरिकांना श्वानाने चावा घेतला, याची रीतसर लेखी तक्रार नगरपालिका प्रशासनास या अगोदर आम आदमी पार्टी च्या वतीने करण्यात आली होती यांनी आरोग्य विभागास वारंवार संपर्क करून पाठपुरावा करून ही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही.
आपण या निवेदनाची दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाची भुमिका घेऊन न्याय मिळवावा असे आसिफ खान. एम. आय.एम. वर्धा यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
0 टिप्पण्या