Ticker

6/recent/ticker-posts

क्षुल्लक कारणावरून मारहाण , युवक जखमी

कोदामेडी येथील घटना, पोलिसात गुन्हा दाखल

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा- दिघोरी / मोठी पोलीस ठाण्याचे हद्दीतील कोदामेडी येथे तुम्ही माझे भावास कुठे लपविले आहे या क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ व मारहाण करून युवकास जखमी केल्याची घटना उघडकीस आली. जखमीचे फिर्यादीवरून पोलिसांनी ४ इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून जखमिचे नाव संतोष बाजीराव सावंत (३७) रा. कोदामेडी तर आरोपींची नावे गरिबा गमा शिंदे (४५) , भाऊनाथ गरीबा शिंदे(२५), शिवा गरीबा शिंदे (२२) , ईश्वर गणपत बाबुळकर(४५) सर्व राहणार कोदामेडी ता. लाखांदूर अशी आहेत . सहायक पोलिस निरीक्षक अमरदास धंदर यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
             शुक्रवारी (ता. १७ मे)  सायंकाळी ७:३० वाजता दरम्यान गरीबा शिंदे यानी संतोष सावंत व त्याचे मजल्या भावास तुम्ही माझ्या भावाला कुठे लपविले या कारणावरून शिवीगाळ केली त्यावेळी भाऊनाथ शिंदे व शीवा शिंदे याने संतोष सावंत याला पकडुन ठेवले व गरीबा शिंदे याने संतोष व त्याचे मजल्या भावाचे डोक्यावर लाकडी काठीने मारल्यामुळे जखम होऊन रक्त लागले असता भांडण सोडविण्यासाठी संतोषची आई मध्यस्थी साठी आली असता ईश्वर बाबुळकर याने तिचे केस पकडुन ओढाताण केली असे जखमीचे फिर्यादीवरून तथा वैद्यकीय अहवालावरून दीघोरी पोलिसांनी अपराध क्रमांक ५१/२०२४ कलम ३२४, ३२३ ,५०४, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक अमरदास धंदर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल नंदेश्वर तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या