Ticker

6/recent/ticker-posts

केसलवाडा/पवार ग्रामपंचायतीची "आदर्श गावा"कडे वाटचाल


• सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर बिसेन यांचा पुढाकार 

• ग्रामपंचायत कमिटीसह गावकऱ्यांचे सहकार्य 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:-लाखनी तालुक्यातील केसलवाडा/पवार चे सामाजिक कार्यकर्ता तथा ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर बिसेन यांचा पुढाकार, दूरदृष्टी व संकल्पनेतून पर्यावरण संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन, गावकऱ्यांना पिण्याचे स्वच्छ व शुद्ध जल, स्वच्छतेवर भर, लोकसहभागातून शासकीय जागेवरील अतिक्रमण निर्मूलन, अवैध व्यवसायांना पायबंद, सौरऊर्जा वापरावर भर या सारखे उपक्रम सरपंच रोमिला बिसेन, ग्रामसेवक एम.एम. लांडगे तथा ग्रामपंचायत कमिटीचे सहकार्याने राबवून केसलवाडा/पवार ची आदर्श गावाकडे वाटचाल सुरू आहे. 
              कोका वन्यजीव अभयारण्याचे बफर झोन मध्ये वसलेल्या वनव्याप्त अविकसित गाव केसलवाडा/पवार ची लोकसंख्या १०८६, कुटुंब संख्या २७९, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब संख्या २००, अनुसूचित जाती ३७८, अनुसूचित जमाती १७५ इतर मागास वर्गाची लोकसंख्या ५३३ आहे. गावात सर्व जाती धर्माचे लोक वास्तव्यास असून डिसेंबर २०२२ मध्ये ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यात सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर बिसेन यांची पॅनल बहुमताने निवडून आली. जनतेतून सरपंच पदी पत्नी रोमिला बिसेन व सदस्य पदी ते स्वतः निवडून आले. जनतेने आपणास निवडून दिल्याने गावाचा कायापालट करण्याचा चंग त्यांनी बांधला असून ते बांधकाम व्यवसायिक असल्यामुळे त्यांचा अधिकारी वर्गाशी निकटचा संबंध आहे. 
              १० जानेवारी २०२३ रोजी ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळताच सरपंच रोमिला बिसेन ग्रामसेवक एम.एम. लांडगे, उपसरपंच अनिल नंदेश्वर, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर बिसेन, अमित खेडीकर, सदस्या छण्णू राहांगडाले, वंदना नंदेश्वर, कविता वलके, अंजीरा नान्हे व गावकऱ्यांचे सहकार्याने सर्वप्रथम गावाचे दर्शनी भागात असलेला खातकुडा स्वखर्चाने साफ करून स्वच्छता केली. गावाचे हद्दीतील सरकारी जागेवरील अतिक्रमण काढून २ हजार वृक्षांची लागवड केली. स्मशानभूमी पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता, गावकऱ्यांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाण्याकरिता ४० लाख अंदाजपत्रकीय रकमेची नवीन पाणी पुरवठा योजना, गावात सांडपाणी वाहून जाण्यासाठी बंदिस्त गटारे, या शिवाय विविध शासकीय योजनातून कोट्यवधी रुपयाची विकास कामे केली. सौरऊर्जा वापरा करिता गावकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर बिसेन यांचे कल्पक्तेतून केसलवाडा/पवार ग्रामपंचायतीची आदर्श गावाकडे वाटचाल सुरू आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


सर्वप्रथम मजूर प्रधान काम सुरू केले

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ५० टक्के ग्रामपंचायत स्तर अंतर्गत गट क्रमांक ३९ ते भारत बोपचे ते वसंता राहांगडाले यांचे शेतापर्यंत पांदन रस्ता बांधकाम सुरू करून तालुक्यात मजूरांना काम उपलब्ध करणारी पहिली ग्रामपंचायत ठरली. कामावर ३५० मजूर कार्यरत आहेत. 

अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट

सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर बिसेन यांचे संकल्पनेतून गावात अनेक विकास कामे करण्यात आली. विकास कामांचे निरिक्षणासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, उपवन संरक्षक राहुल गवई, व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक पवन जेफ, कार्यकारी अभियंता(लपा जिप) कापगते, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले, जलसंधारण अधिकारी जगताप, गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे, पंचायत विस्तार अधिकारी प्रमोद हुमने, लांजेवार, गट शिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे, पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे इत्यादी अधिकाऱ्यांनी केसलवाडा/पवार येथे भेटी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या