Ticker

6/recent/ticker-posts

अनुभव शिक्षा केंद्राची कोर मीटिंग संपन्न

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
 भंडारा:- मिस्किल टॅंक गार्डन भंडारा येथे अनुभव शिक्षा केंद्राची कोर मीटिंग घेण्यात आली. या मीटिंगमध्ये भंडारा जिल्ह्यातील युवकांचे नेतृत्व कशाप्रकारे विकसित करता येईल. याबाबत चर्चा करण्यात आली तसेच अनुभव केंद्राची मूल्य सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, लिंगसमभाव, प्रामाणिकपणा, उत्तरदायित्व, श्रम प्रतिष्ठा, आणि पर्यावरण सुरक्षा याविषयाला घेऊन युवकांना कशाप्रकारे एकत्र करता येईल, आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रात मुल्यांआधारीत अनुभव कट्टा स्थापन करून युवकांना प्रशिक्षण देणे याबाबत नियोजन करण्यात आले. अनुभव शिक्षा केंद्र भंडारा व नागपूर चे नवनियुक्त जिल्हा प्रशिक्षक  आकाश रामटेके यांचे संविधान प्रास्ताविका व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी ए. एस. के. च्या जिल्हाध्यक्षा कु. कौतुक मेश्राम, खजिनदार धम्मदिप मेश्राम, सचिव सत्यपाल तितीरमारे, समीर डोंगरे, मंगेश मेश्राम, साजन घरडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या