Ticker

6/recent/ticker-posts

....तो रस्ता "इजिमा" तून "प्रजिमा" मध्ये परावर्तित करा


• प्रकरण पिंपळगाव/सडक-मुरमाडी/तूप-खराशी रस्त्याचे 


कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अखत्यारीत असलेला पिंपळगाव/सडक व्हाया मुरमाडी/तूप ते खराशी ह्या इतर जिल्हा मार्गाचे पर्याप्त निधी अभावी रुंदीकरणाचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे. त्यामुळे आवागमन करणाऱ्या वाहनांना ओव्हरटेक करतांना अडचणीचे ठरून अपघाताची शक्यता असते. त्यामुळे सदर रस्ता प्रमुख जिल्हा मार्गात परावर्तित करणे आवश्यक झाले आहे. 
               पिंपळगाव/सडक व्हाया मुरमाडी/तूप ते खराशी हा रस्ता तालुका मुख्यालयास चूलबंद खोऱ्यासह गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोर., जिल्ह्यातील लाखांदूर व पवनी तालुक्यास रस्ता मार्गाने जोडतो. ह्याच रस्त्यावर भूगाव/पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी राज्यासह पर-राज्यांतूनही भाविक येत असल्यामुळे वर्दळ असते. याशिवाय या रस्त्यावरून चालणारी प्रवाशी वाहने तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही गर्दी असते.
         सदर रस्ता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अखत्यारीत असून इतर जिल्हा मार्ग प्रकारात मोडल्याने शासनाकडून नगण्य निधी उपलब्ध होतो. त्यामुळे पिंपळगाव/सडक-मुरमाडी/तूप ते खराशी रस्त्याचे रूंदीकरणाचे काम रखडलेले असून वाहनांना ओव्हरटेक करतांना तारेवरची कसरत करावी लागते. ह्या प्रकाराने अनेक अपघात झालेले आहेत. प्रवाशी तथा वाहन चालकांची गैरसोय लक्षात घेता हा रस्ता इतर जिल्हा मार्गातून प्रमुख जिल्हा मार्गात परावर्तित करून रुंदीकरणाचे काम करणे गरजेचे झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या