Ticker

6/recent/ticker-posts

विनोद खोब्रागडे ( तलाठी) विरुद्ध जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी व इतर फौजदारी खटला आज न्यायालयात


 राजेश येसेकर भद्रावती. 


भद्रावती / वरोरा : संघर्षी विनोद खोब्रागडे तलाठी विरुद्ध जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी व इतर फौजदारी खटला न्यायालयात सुरू,आज आदेशाकडे संपूर्ण महाराष्ट्रातील भारतातील जनतेचे लक्ष लागले आहे. 
महाराष्ट्रात ,व भारतात गाजत असलेल्या IAS सणदी अधिकारी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री . विनय गौडा जी सी व इतर विरुद्ध अट्रासिटीचा प्रकारणात आज दिनांक ०८/०५/२०२४ रोजी, माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा येथे आदेशाकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे. 
विनोद कवडुजी खोब्रागडे यांनीच पुराव्यासह फौजदारी अट्रासिटीचे गुन्हे दाखल करण्यासाठी केस दाखल केली होती व खुद्द आर्गुमेंन्ट केले होते. 

न्यायमूर्ती वरोरा यांनी स्पेशल केस रजिस्टर करुन crpc कलम २०२ मध्ये आदेश पारित करून वस्तुनिष्ठ अहवाल ठानेदार वरोरा यांना मागीतले होते
ठानेदार वरोरा यांनी कुठलीही चौकशी न करता, बोगस अहवाल रिट पीटिशन असे लिहून न्यायालयात सादर केला,
आता ठानेदार वरोरा  यांना रिट पीटिशन पाच प्रकारची आहेत व ते फक्त उच्च न्यायालयात भारतीय संविधानातील अनुच्छेद २२६, नुसार दाखल केली जाते, जिल्हा व सत्र न्यायालयात नाही,यांचेच भान नाही,इतके अज्ञानी वरोरा पोलिस प्रशासन आहेत,तर अहवाल कसा दिला असेल यावरून कल्पना करू शकता??
बोगस अहवाल न्यायालयात सादर केल्यामुळे पोलिस प्रशासन यांच्यावरही कलम २१९नुसार फौजदारी कारवाई करन्याची मागणी न्यायालयात केली आहे. 
फिर्यादी खुद्द विनोद खोब्रागडे तथा जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा तलाठी यांनीच आर्गुमेंन्ट केले आहे. 
 फिर्यादी विनोद कवडुजी खोब्रागडे विरुद्ध आरोपी श्री. विनय गौडा जी. सी. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर व ईतर यांचावर अट्रासिटीचा दोन प्रकरण क्रमांक ४८,व ५२ मध्ये सुनावणी झाली आहे,आज आदेशाकरीता आहे. 
विशेष म्हणजे एक वर्षा आधीच याच विद्यमान मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी. सी. यांना थेट अटक वॉरंट काडुन दिल्लीत विनोद कवडुजी खोब्रागडे यांनी, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग नई दिल्ली यांचा कडे प्रकरण दाखल करुन घेऊन गेले होते,व सनदी अधिकारी यांची संपूर्ण चंद्रपूर जिल्हात, महाराष्ट्रात भारतात नाचक्की झाली होती,हा इतिहास ताजा आहे. 
आता नूकतेच, दिनांक १७/०४/२०२४रोजी मा.जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना, सुद्धा माननीय राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नई दिल्ली यांनी नोटीस इशु करुन १५ दिवसांत वस्तूनिष्ठ अहवाल मागितला आहे, अजुनही अहवाल दिला नाही. 
गंभीर तक्रार ३३५लोकांनी दिल्यानंतर ही आतापर्यंत कुठलीही कारवाई पोलिस प्रशासन यांनी केली नाही,
चौकशी अहवाल अद्याप अप्राप्त असताना ही शिक्षा देने,पक्षपात व भेदभाव करणे, जानीवपुर्वक, आकसबुद्धीने, मानसिक , शारीरिक, आर्थिक, भावनिक, मनस्ताप देने, लोकसभा निवडणूकीत नामनिर्देशन पत्र जानीवपुर्वक नामंजूर करणे, पदाचा व अधिकाराचा गैरवापर करणे, मुलभूत हक्कापासून वंचित करणे, बोगस अहवाल वरिष्ठांना सादर करणे,अशाप्रकारे अनेक आरोप जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा वर पुराव्यासह ठेवन्यात आले आहे. 
माननीय विधी आयोग नई दिल्ली, तसेच माननीय राष्ट्रपती महोदया भारत सरकार नई दिल्ली,व माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश साहेब नई दिल्ली,व मुख्य निवडणूक आयोग नई दिल्ली व मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र, तसेच  निवडणूक निरीक्षक चंद्रपूर, विभागीय आयुक्त नागपूर,पोलिस अधीक्षक चंद्रपूर,व CBI,ED,ACB, तसेच सर्वच राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष यांना गंभीर तक्रार देऊन यांच्यावर कारवाई करुन  त्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करुन बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. 
ज्याअर्थी सुप्रीम कोर्टाचे पाच न्यायमूर्ती यांच्या संविधान घटनापीठाने नुकतेच जजमेंट दिले आहे की , कायद्याच्या बाहेर जाऊन नियमबाह्य व बेकायदेशीर काम करनारे लोकसेवक म्हणजे (पगारी नौकर) सर्वच आले यांना संरक्षण मिळणार नाही.
भारतीय संविधानातील अनुच्छेद १४१नुसार सुप्रीम न्यायालयाचे आदेश ,निर्देश जजमेंट ,देशातील सर्व न्यायालयाला व नागरिकांना बंधनकारक आहे हे प्रथम लक्षात घ्या
तक्रारदार खुद्द विनोद कवडुजी खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक वरोरा चंद्रपूर हेच आहेत
एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही. 
भारतीय संविधानातील अनुच्छेद १४कायद्यापुढे सर्व समान आहेत, न्यायमूर्ती असेल तरीही ते कायद्यापुढे मोठे नाहीत
भारतीय संविधानातील अनुच्छेद १७ नुसार पक्षपात करणे, भेदभाव करणे, उमेदवाराला मुलभूत हक्कापासून वंचित करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. 
लोक बोलत नाही म्हणून त्यांचावर अन्याय अत्याचार होतात असे सुप्रीम न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणतात
भारतातील सर्व समाजाने जागृत राहावे,व लोकसभा निवडणूकीत १०० टक्के मतदान करुन चांगला उमेदवार संसद मध्ये निवडुन पाठवावे,कारण तिथे कायदा बनत असतो असे जनहितार्थ जारी  जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा, तलाठी,विनोद खोब्रागडे  वरोरा चंद्रपूर यांनी प्रसार माध्यमांत माहिती दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या