संजीव भांबोरे भंडारा
भंडारा :-पवनी तालुक्यातील ग्रामपंचायत पालोरा येथे 2022 मधे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्री. शिशुपाल रामटेके यांना गावातील जनतेने विश्वास टाकून प्रचंड बहुमताने निवडून दिले त्यांच्या विरोधात असलेले अंबादास धारगावे यांना मोठ्या हार मनावी लागली .त्याच सुढभावनेने पेटून सरपंच शिशुपाल रामटेके यांच्या विरोधात अंबादास धारगावे यांनी सरकारी जागेवर घर बांधून अतिक्रमण केल्याबत खोटे दस्तवेज सादर करून फसविण्याचा कट कारस्थान रचले .परंतु विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावत सरपंच शिशुपाल रामटेके यांनी हार न मानता मुंबई हाय कोर्ट नागपूर खंडपिठ येथे धाव घेत विजय मिळवला आहे. शिशुपाल रामटेके यांना जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र अधिनियम 1958 चे कलम 14(1) ज नुसार अपात्र करण्यात आले होते. परंतु रामटेके यांनी कलम 16 (2) नुसार अप्पर आयुक्त नागपूर यांचे कडे अपिल केली व त्यात अप्पर आयुक्त नागपूर यांनी योग्य बाबींची चौकशी करून त्यांना पुन्हा पदावर कायम करण्याचे आदेश दिले. विरोधात असलेले अंबादास धारगावे यांनी स्वतःची हार झाल्याचे पाहून मुंबई हायकोर्टात अपिल केली परंतु त्यांना तिथे पन हार पत्कारावी लागली. मुंबई हायकोर्ट नागपूर खंड पिठाणे दि.3 मे 2024 रोजी झालेल्या दोन्ही पक्षकाराचे युक्तिवाद ऐकून शिशुपाल रामटेके सरपंच पालोरा यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळुन लावले व त्यांना सरपंच पदावर कायम ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले.
सरपंच शिशुपाल रामटेके यांचे कडून ऍडव्होकेट भोजराज धंडाले यांनी बाजू मांडली.


0 टिप्पण्या