Ticker

6/recent/ticker-posts

शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी


संजीव भांबोरे भंडारा 
भंडारा :- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे गौतम बुद्ध यांची 2568 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी भंते विनय बोधी महाथेरो व  श्रामनेर संघपाल यांच्या उपस्थितीत बुद्ध, धम्म, संघ, वंदना घेण्यात आली. त्यानंतर भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर व सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले .यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे उपस्थित होते .यावेळी भंते विनय बोधी महाथेरो  ,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांनी बौद्ध धम्मावर  थोडक्यात मार्गदर्शन केले .कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आशिष मेश्राम ,अंबादास मेश्राम ,गुलाब गोडसे, प्रशांत बोधले ,प्रमोद वासनिक, ज्योती उके, आर्यन उके, सुशीला मोटघरे,पंचशीला मोटघरे, महानंदा मोटघरे ,मनीषा मोटघरे,
सुनंदा कांबळे , महानंदा कांबळे, सुजाता चवरे,  भारती मोटघरे, निकिता मोटघरे,शीला शेंडे, निकिता मोटघरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सहकार्य केले. यावेळी गुलाब गोडसे व  चाण्णा वेलतूर महिला भगिनी यांच्या वतीने खीरदान कार्यक्रम घेण्यात आला.  यावेळी बौद्ध उपासक संघ व सर्व बौद्ध उपासक ,उपासिका यांना  खीरदान वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या