रुपाली मेश्राम चित्रा न्युज
मोर्शी - आज बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे श्रीराम नरसिंग कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी चा सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर प्रमोदजी पोतदार तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन कोरडे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिपरिचरिका जयश्री मोरे यांनी केले यावेळी रुग्णालयातील अधिपरिचरिका वर्षा दारोकर, मीनाक्षी वगारे नरसिंग कॉलेजचे शिक्षक पंकज पांडे तसेच रुग्णालयातील कर्मचारी सुजित वानखडे, विनय शेलुरे, प्रशांत बेहरे, पुष्पा पंधरे, कल्पना पंधरे, भारती राऊत, अर्चना पवार, नागोराव खडसे ,आशिष नेरकर व इतर कर्मचारी हजर होते.


0 टिप्पण्या