Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळी येथील महादेव मंदीराच्या भिंतीवर जाहिरातीचे बोर्ड लावले.मंदीर प्रशासन का झाले आंधळे ?


विठ्ठल पाटील लातूर 
लातूर :-मुंबईत घडलेल्या दुर्घटने नंतर राज्य भरात विनापरवाना जाहिरात फलक, होर्डिंग्ज लावणा-याविरुध्द संताप पसरला आहे.व याची दखल शासन स्तरावरुन घेतली असुन अनेक शहर व गावातील विनापरवाना जाहिरात फलक लावणा-यांवर कडच कारवाई होत असल्याचे वाचण्यात येत आहे.
माञ हाळी-हंडरगुळी येथील उदगीर- अहमदपुर राज्यमार्गालगत तसेच चौकाचौकात विनापरवाना होर्डिंग्ज मोठ्या प्रमानात लटकत असल्याचे दिसते.कारण यावर अजुन पर्यंत कारवाही करण्याचे धाडस कुणी ही दाखविले नसल्यामुळे पुन्हा होर्डिंग्ज वाॅर सुरु झाले असुन,आणि एका शाळेच्या मंडळाने तर कहरच केला असुन दहावी पास विद्यार्थ्यांबद्दल शुभेच्छा व अभिनंदन करणारे फलक चक्क महादेव मंदीराच्या भिंतीवर लटकविले असल्याचे जनतेला आणि भाविकांना दिसते.माञ मंदीर दक्षता कमीटीला दिसत कसे नाही.का मंदीर प्रशासन आंधळे झाले की काय.असा प्रश्न व्हि.ए.जाधव,एच.बी.चिंतलवार, के.ए.अनलदास यांनी आमच्याशी बोलताना मंदीर प्रशासनास विचारला आहे.तसेच १० वी.पास विद्यार्थ्यांसह शाळेचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे.तसेच यशस्वी विद्यार्थ्यांसह संस्थेचा अभिमान जनतेला आहे. म्हणुन काय मंदीराच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर शुभेच्छा फलक / होर्डिंग लावण्याचा व मंदीराचे पाविञ्य धोक्यात घालण्याचा अधिकार त्या शाळेला मंदीर प्रशासनाने दिला कसा नसेल दिला तर मग हे होर्डिंग्ज मंदीर प्रशासनास दिसत नाही का ? मंदीर प्रशासन तथा देखरेख समिती मेंबर्स आंधळे झालेत का ? तसेच मंदीर हे भजन,किर्तन,महाआरती,पारायण या पविञ प्रथा परंपरांचे पालन करणारे ठिकाण असते.माञ या ऐवजी येथील श्री.महादेव मंदीर हे जाहिरातीचे बोर्ड लावण्याचे केंद्र बनल्याचे दिसते.अण् या जाहिरातबाजीला मंदीर देखरेख समीतीच खतपाणी घालत असुन हा जाहिरातीचा बोर्ड चालतो तर मग माता आहिल्यादेवीची मुर्ती का बसू देत नाहीत . तेंव्हा मंदीर समिती या बाबत कठोर भुमिका घेणार आणि येथे जाहिरातीसह कोणतेही फलक लावण्यास मनाई आहे.असे दर्शनी भागावरच्या बोर्डावर लिहिणार का.. याकडे हंडरगुळीसह परिसरातुन येथे दर्शनासाठी येणा-या हजारो भाविक- भक्तांचे लक्ष लागले आहे ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या