Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळीत चालतोय बेकायदालाकडी अड्डा ; वनविभागास कशाचा मिळतोय गड्डा ? जनतेचा प्रश्न .....


विठ्ठल पाटील लातूर 
लातूर :-वन विभाग उदगीर अंतर्गत येणा-या हाळी-हंडरगुळी या गावात गत कांही वर्षापासुन शासनाचा परवाना नाही, तरी ही बेकायदा लाकडी अड्डा खुले आमपणे चालत असल्याचे जनतेत बोलले जाते.आणि या अड्ड्यामध्ये अवैधरित्या कापलेल्या चोरीच्या मोठ मोठ्या झाडांची कत्तल होत आहे. आणि ही झाडे लाकडांचे साहित्य बनविणा-या फर्निचरच्या दुकाणात विकली जातात.तरी ही संबंधित अधिकारी गप्प का ? असा प्रश्न जनतेतून चर्चीला जात आहे..
वनविभाग उदगीर तालुका अंर्तगत येणा-या हाळी-हंडरगुळी शिवारातील अनेक लहान-मोठी झाडांची विशेष म्हणजे सागवानची पण अवैधरित्या दिनदहाडे कत्तल होत असल्याची आणि येथील लाकडी अड्ड्यामध्ये कटाई होत असल्याची चर्चा आहे.
 आजकाल झाडे लावा-झाडे जगवा ही मोहिम राबवुन दरवर्षी करोडो रुपे शासन खर्च करित असते.आणी दर वर्षी पावसाळ्यात झाडे लावण्याचा *लळा* प्रशासनास लागतो.माञ वन खात्याच्या नाकावर टिच्चुन लाकुड तस्कर मंडळी रोज शेकडो झाडांचा *गळा* कापुन आरा मशिन मध्ये ट्रक व ट्रॅक्टर मधून विकत असल्याचे सदा दिसुन येते.माञ वनविभागाला कसे दिसत नाही. हे एक नवलच आहे..
तसेच आरा मशीन मध्ये कटाई केलेले झाडांची विक्री अवैधरित्या चालत असलेल्या फर्निचर बनविणा-या दुकाणात होत आहे.म्हणुन हाळी व भागाचे वाळवंट होताना ही टीएफ
ओ गप्प का?का,अवैधरित्या चालत असलेल्या लाकडी अड्डा मालकातर्फे तालुका फाॅरेस्ट (TFO) अधिकारी महाशयाला गांधीबाबांचा गड्डा मिळत  आहे.असे प्रश्न जाणकार जनतेमधुन विचारले जातात.हाळी-हंडरगुळीसह परिसरात खुप जुनी व डेरेदार असे आंबा,चिंच,पिंपळ यासारख्या थंड सावली देणा-या लहान-मोठ्या झाडां सह सागवानांची झाडे बहूतांशकरुन यंञाद्वारे राञीस तोडतात.आणि या गावातील व परिसरातील बेकायदेशीर पणे चालणा-या लाकडी अड्यामध्ये विकतात.आणि हा सगळा गोरख धंदा वनविभागाच्या नाकावर टिच्चून चालत आहे.किंबहूना संबंधित खाते व अधिका-याच्या अर्थपुर्ण मदतीनेच या भागात झाडांची तोड व बेकायदा रंधा मशीनचा जोमात चालतोय धंदा. अशी कुजबूज वनप्रेमींसह सागवान तस्करांमध्ये होत आहे.या चर्चेवरुन असे लक्षात येते की वनविभागच शेत खातोय.हे माञ नक्की झाले आहे.
एकंदरीत येथे अवैधरित्या चालणारा चालणारा लाकडी अड्डा तसेच हाळी व परिसरात होणारी सागवान व अन्य झाडांची कत्तल.हा सर्व प्रकार उदगीर तालुका फाॅरेस्ट विभागाला माहिती आहे.तरीही हा विभाग जाणुनबुजून कारवाही करण्यास टाळाटाळ करित आहे.म्हणुन या धंद्याची गाडी सुसाट धावत सुटली असुन,जिल्हा फाॅरेस्ट (*DFO*)अधिकारी हे तरी या अवैध धंद्यावर कारवाही करतील का?असा प्रश्न उपस्थित होत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या