शासनाच्या आदेश आहे तलावातील काळी माती शेतात टाकावी पण काही लोक चोरून विटभट्ट्यावर घेऊन जात असल्याची चर्चा आहे
काही लोक रात्री स्वतःची मशीन लावून रात्री बारा ते चार वाजता पर्यंत माती घेऊन जात असल्याची ही चर्चा आहे
मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-वसमत शहरातील मोठया तलावाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे तलावातील साचलेला गाळ काढून परिसरातील शेतात टाकुण शेत जमीन सुपीक होऊण शेतकऱ्यांची पिक उत्पादन क्षमता वाढू शकते . म्हणुन सदरील मातीरूपी खत शेतकरी बांधवांनी शेतात नेऊण टाकणे अपेक्षीत होते. परंतु तसे न होता वसमतशहराच्या आजुबाजुला अवैध विट भटयाने शहराला विळखा घातला असुन काही लोक वीट भट्ट्यावर माती घेऊन जात असल्याची जोरदार चर्चा आहे. शासनाने माती उपसा करण्यासाठी एक मशीन लावले आहे . काही शक्तीशाली लोक दादागिरी करून स्वतःचे जेसीबी मशीन लावून माती उपसून वीट भट्ट्यावर नेत असल्याची जोरदार चर्चा आहे आणि हे काम रात्रभर युद्ध पातळी वर नियम धाब्यावर बसवुन चालू आहे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शासनाचे अवैध रित्या गौण खनिज उत्खनन करूण रॉयल्टी शिवाय चोरी करणाऱ्या वर कडक कारवाई करावी अशी सामान्य जनतेतून मागणी व विनंती होत आहे


0 टिप्पण्या