Ticker

6/recent/ticker-posts

शोभायात्रेत विविध वेशभूषा प्रदर्शन करीता बाल संस्कार वर्गाला प्रथम पुरस्कार

रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
भंडारा:विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती भंडारा च्या वतीने बाल संस्कार वर्ग तर्फे हनुमान जयंती निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत नेहरू वार्ड मेंढा वस्तीतील बालकांनी भारतातील प्रत्येक संस्कृतीचे वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळी वेशभूषा प्रदर्शित करून समानता व एकात्मतेचा संदेश दिला होता,आपल्या भारत देशात जरी आपण अनेक राज्यात ,क्षेत्रात राहतो तरी पण आपली भूमी एकच असून एकतेने राहतो.
हनुमान मंदिर समितीच्या संयुक्त विद्यमाने बाल संस्कार वर्ग  शिक्षिका सौ.अनुराधा माने मैडम यांचा सत्कार करण्यात आला.तसेच या बालकांना प्रथम पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.मंदिर कमिटीच्या वतीने सौ.कविता कृपाले ,सौ माधुरी ओघारे.श्रीमती सुनंदा ठाकरे, सौ आरती मते,तसेच ओवी मते, श्रावणी इंदुरकर,राशी ओघारे,पूर्वी शिवरकर, देवांशी नेवारे,महेश्वरी बिसने,नेहा बिसने,वैष्णवी संतेकार, प्राची संतेकार,इशिका बारबरय्या,नेहा मेश्राम,नीलिमा नेवारे,पूर्वी राऊत, कृत्तिका राऊत,रिद्दम मुद्दमवार, ई बालकांचे कौतुक करण्यात आले.
मा. जिल्हा प्रतिनिधि/वार्ताहर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या