Ticker

6/recent/ticker-posts

अति मद्य प्राशनाने ६० वर्षीय इसमाचा मृत्यू


कन्हाळगाव येथील घटना, पोलिसांत मर्ग दाखल 


कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा :- राहते घराच्या स्लॅबवर झोपलेला एक ६० वर्षीय इसम अती मद्य प्राशनाने मृत झाल्याची घटना रविवारी(ता.१९मे) सायंकाळी ७:०० वाजता दरम्यान कन्हाळगाव येथे उघडकीस आली. मृतकाचे मोठ्या भावाचे फिर्यादी वरून लाखांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतकाचे नाव श्रावण जैराम शहारे(६०) रा. कन्हाळगाव, तालुका लाखांदूर असे आहे. पोलिस निरीक्षक सचिव पवार यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
                 श्रावण पत्नी व २ मुलांसह वास्तव्यास असून पत्नी वेडसर, मोठा मुलगा मुका असून लहान मुलगा कामानिमित्त बाहेर गावी गेला असल्यामुळे श्रावण लहान भावाकडे गावातच वास्तव्यास राहत होता. तो नियमित दारू पिण्याच्या सवयीचा असून दिवसा व रात्री आपले घराच्या स्लॅब वर झोपत असे. रविवारी(ता.१९) सायंकाळी ७:०० वाजता दरम्यान श्रावण चा मोठा भाऊ त्याचे घराकडे गेला असता तो घरी दिसून आला नाही. त्यामुळे घराचे स्लॅब वर जाऊन पाहिले असता झोपलेला दिसला. तो कोणतीही हालचाल करीत नसल्यामुळे मरण पावल्याची खात्री करून मोठ्या भावाने घटनेची माहिती गावकऱ्यांसह लाखांदूर पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे, निशा खोब्रागडे, पोलिस नायक सुभाष शहारे, पोलिस शिपाई अनिल राठोड, चालक किशोर टेकाम हे घटनास्थळी पोहचले. सर्व सोपस्कार आटोपून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार गोपाल कोसरे तपास करीत आहेत. मनमिळावू श्रावणच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या