Ticker

6/recent/ticker-posts

अवैध रेती वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली पकडली

 इंदिरा नगर रेंगेपार/ कोहळी येथील घटना 

 पोलिसांत गुन्हा दाखल 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- विना रॉयल्टीने ट्रॅक्टर ट्रॉली द्वारा रेतीची अवैध वाहतूक करतांना मिळून आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी रेती तस्कर पिता पूत्रावर गुन्हा दाखल करून ४ लाख ३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना सोमवार(ता.२०मे) रोजी रात्री ८:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. आरोपीचे नाव प्रशांत सुरेश बोपचे(२८) व सुरेश माणिकराव बोपचे(६०) दोघेही रा. सालेभाटा, तालुका लाखनी अशी आहेत. महिला पोलिस हवालदार वासंती बोरकर तपास करीत आहेत. . 
                 चुलबंद नदी खोऱ्यातील रेती घाटातून अवैध रेती उपसा व वाहतूक सुरू असल्याचे गुप्त माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे सहकाऱ्यांसह पोलिस ठाण्याचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना इंदिरा नगर रेंगेपार/कोहळी येथे एक लाल रंगाचा महिंद्रा युवो २७५ डीआय कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ झेड १२३९ व विना क्रमांकाच्या ट्रॉलीत रेती वाहतूक होत असल्याचे दिसून आल्याने त्यास थांबवून पास परवान्याबाबद विचारणा केली असता मिळून आला नाही. तसेच सुरेश माणिकराव बोपचे यांचे सांगण्यावरून अवैध रेती वाहतूक करीत असल्याचे चालक प्रशांत बोपचे यानी सांगितल्याने पंचासमक्ष ट्रॅक्टर ट्रॉली किंमत ४ लाख रुपये व १ ब्रास रेती किंमत ३ हजार रुपये असा एकूण ४ लाख ३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक १९४/२०२४ कलम ३७९, १०९ भादवी अन्वये प्रशांत बोपचे व सुरेश बोपचे यांचेवर गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली. पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात महिला पोलिस वासंती बोरकर तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या