विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-उदगीर शहरानंतर तालुक्यात सर्वात मोठे व राज्यमार्गा शेजारी असलेल्या हंडरगुळी-हाळी व परिसरातील जनता रोज उदगीर - अहमदपुर तसेच लातुर-नांदेड-बिदर आदी येथून शहराकडे ये-जा करतात.तसेच बसस्थानका ऐवजी जुन्या बस थांब्या जवळ रोज हजारो प्रवाशी भर उन्हात व पावसात चिमुकल्या लेकरा-बाळा सह थांबलेले असतात.तरीही हाळी- हंडरगुळीच्या जुन्या बस थांब्या जवळ प्रवाशी शेड उभारावा अशी भावना एस.टी.महामंडळाच्या अधिका-याची नाही.कारण सध्या रखरखते ऊन व येणारा पावसाळा याचा विचार करता येथे प्रवाशी शेड कधी खुला करणार?असा सवाल डी.सी.यांना जनता विचारत आहे.तसेच याबाबत एस.टी.चे वरीष्ट अधिका-यानी निष्ठुरता सोडावी.अण् अपंग व चिमुकल्या बाल प्रवाशांसह गर्भवती प्रवाशी भगीनींची तरी 'जान' एस.टी.खात्यातील "जानरावांनी'' ठेवावी.आणी हंडरगुळीच्या जुन्या बस थांब्याजवळ शेड बांधावे.अशी मागणी ञस्त प्रवाशी जनतेची आहे.. वडगाव,तांडा,टाकळगाव,शेळगाव, चिद्रेवाडी,चवळेवाडी,राचन्नावाडी, नागदरवाडी,बोरगाव ता.चाकुर व आनंदवाडी,मोरतळवाडी,वंजरवाडी,चिमाचीवाडी,आडळवाडी,रुद्रवाडी ता.उदगीर या व अन्य कांही गावाची प्रवाशी जनता उदगीर,अहमदपुर, नांदेड,बिदर,लातुर,हैद्राबाद,मुंबई या व अन्य शहराकडे ये-जा करतात.व बसस्थानका ऐवजी हाळी-हंडरगुळी येथील जुन्या बस थांब्याजवळ रोज हजारो प्रवाशी गत कांही वर्षापासुन भर उन्हात व पावसात चिमुकल्या बाळासह अपंग व्यक्ती बसची वाट बघत थांबतात.माञ या ठिकाणी बस व प्रवाशी थांबण्याचा शेड नसल्याने बसेस कुठेही थांबतात.म्हणुन अपंग व महिलांना चिमुकल्या बाळांना घेऊन बस पकडणे महाकठीन झाले आहे.आणि प्रवाशांची होणारी मोठी हेळसांड,गैरसोय बघून अन्य जनता हळहळ व्यक्त करित आहेत.म्हणुन या बद्दल पेपरबाजी करुन ही वरिष्ठ अधिका-यांना कसे कांहीच वाटेना ? का गरीब प्रवाशांची गैरसोय,हेळसांड व्हावी असेच एस.टी.अधिका-यांना वाटत आहे,का ? असे प्रश्न हाळी व परिसरातील जनतेतून चर्चीले जात आहेत.तेंव्हा लातुर एस.टी. खात्याचे जानकार असलेले वरिष्ठ "जानराव" हे अपंग,जेष्ठ महिला व चिमुकल्या गरीब प्रवाशांची "जान" ठेवतील अन् हंडरगुळी येथे प्रवाशी व बस थांबा शेड उभा करतील का व कधी. याकडे हाळी-हंडरगुळीसह परिसरा- तील गरीब प्रवाशांचे लक्ष लागले आहे


0 टिप्पण्या