विठ्ठल पाटील लातूर
लातूर :- उदगीर तालुक्यातील हाळी व हंडरगुळी या 2 गावामधून गेलेल्या नांदेड-बिदर राज्यमार्गाला लागुन असलेल्या सा.बां.खात्याच्या जागेवर व जि.प.के.प्रा.शाळेच्या मेन व जुन्या गेट समोर अतिक्रमण करुन संबंधित अन्न व औषध विभागाचा कसलाच परवाना नसतानाही अवैध माॅंस,मटन विकणा-या या विक्रेत्यांना आर्शिवाद आहे कुणाचा?असा प्रश्न जानकार हाळी-हंडरगुळीकरामधून चर्चीला जात आहे.तसेच येथील सर्व कसाई कापलेले कोंबडे,बकरे यांचे वासघाण पाणी,हाडे व रक्त रोडवर व तिरु नदीपाञात व पुलावर टाकतात. यामुळे सर्वदुर घाणवास पसरतो.अन् हाच घाणवास आला की हाळी — हंडरगुळी आले.बघा.असे येथून बसने व अन्य वाहनाने ये-जा करणारे सर्व प्रवाशी म्हणतात.एकंदरीत ही दुर्गंधी हाळी-हंडरगुळीची खरी ओळख बनली आहे.व याचा सगळ्यांना विशेषत: युवकांना गर्व वाटतोय. तसेच याबद्दल अधून-मधून अनेकदा पेपरबाजी करुनही येथील अवैध माॅंस,मटन विक्रेत्यांकडे संबंधित सा.बां.खाते तसेच अन्न व औषध खाते यांचे विशेष दुर्लक्ष होत आहे. व तसेच आर्शीवाद असल्याचे समजते.. याची थोडक्यात माहिती अशी की,या गावातील बहूतांश पानस्टाॅल,किराणा व भुसार,चांभार,कापड,ज्वेलरी अदी दुकाणात संबंधित विभागाचे रितसर लायसन्स दर्शनी भागात लटकवलेले दिसते.माञ सा.बां.खात्याच्या नाली- वर व पुढे म्हणजे बी अॅन्ड सी च्या जागेवर अतिक्रमन केलेल्या माॅंस , मटन विक्रेत्यांकडे रितसर लायसन्स असल्याचे लटकवलेले दिसत नाही.व या बद्दल विविध पेपरातून आवाज उठविला तरीही याकडे संबंधित खाते जाणुन-बुजुन दुर्लक्ष करित असल्याचे दिसुन येते.परिणामी या अवैध माॅंस - मटन विक्रेत्यांनी जि.प,शाळेच्या अवती-भोवती अजगरीविळखा तर घातला आहेच.सोबतच सा.बां.खाते यांची जागाही गिळंक्रत केली आहे.. *विनातपासणी करतात कत्तल..* कोंबडे,बकरे,बैल यांची कत्तल करण्यापुर्वी पशू वैद्यकिय अधिकारी यांच्याकडून तपासणी करणे नियमा नूसार गरजेचे आहे.कारण संबंधित पशू,पक्षी तपासुन ते खाण्यायोग्य आहे.असा अहवाल गुरांच्या डाॅक्टरने दिल्यानंतरच कत्तल व विक्री करता येते.माञ येथील अवैध माॅंस व बीफ विक्रेते तपासणी न करताच रोगट माॅंस,मटन विकतात,यामुळे ग्राहक जनतेच्या आरोग्याचे बरेवाईट झाले तर याला जबाबदार कोण? पहिली गोष्ट म्हणजे सा.बां.खात्याची जागा. त्यावर बिनधास्तपणे थाटलेत अवैध माॅंस,मटन,बीफ विक्री सेंटर्स.तरीही याकडे संबंधित अधिकारी डेअरींगने कारवाई करण्याऐवजी दुर्लक्ष करुन अर्थपुर्ण आर्शिवाद देतात.म्हणुनच हे अवैध धंदे उघड्यावर व अतिक्रमीत जागेत बिनधास्तपणे चालतात.म्हणे . तरी याकडे वरिष्ठांनी त्वरीत लक्ष देऊन कारवाई करावी,अन्यथा संबंधित मंञ्याकडे सचिञ तक्रार करण्याच्या तयारीत युवावर्ग आहे..( वेस्टेज माॅंस रोडवर अण् कुञे ओरड असतात जनतेवर } राज्य मार्गालगत असलेल्या सा.बां.खात्याच्या जागेवर बांधलेल्या नालीवर व शाळेच्या सुरक्षा भिंतीस लागुन अतिक्रमन करुन उघडपणे सुरु असलेल्या अवैध माॅंस विक्री सेंटर मधील वेस्टेज माॅंस व हाडं रोडवरच टाकत असल्याने या ठिकाणी मोकाट कुञ्याचा वावर व गोंगाट वाढला असुन,येथून मंदीरा- कडे ये-जा करणा-या भाविकांना आणी जनतेला ही घाण तुडवतच जावे लागते. तसेच कुञे पिसाळून जनतेच्या अंगावर धावुन जातात.यामुळे जनतेसह स्ञी - पुरुष भाविकांत याची पसरली असुन,तरी पण अनाधिक्रतपणे व ते पण सा.बां.खात्याची असलेल्या जागेवर,नालीवर अतिक्रमण करुन माॅंस विक्रीस परवानगी का व कुणी दिली.तसेच या विनापरवाना माॅंस विक्री करणा-यावर कारवाई करण्याचे धाडस सा.बां.खाते व अन्न भेसळ खाते यापैकी एकाही अधिका-यामध्ये नाही का ?


0 टिप्पण्या