Ticker

6/recent/ticker-posts

वंचितांचा विजयी अश्र्व....चौफेर उधळतो आहे!!



सुरेश रा शिरसाट, अकोला 

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष कॉंग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेना उबाठा पक्ष हे बाळासाहेब आंबेडकरांचे /  वंचित बहुजन आघाडीचे वोट काटण्यासाठी  " एडी चोंटी का जोर !" लावत आहेत.इतिहासातील "आंबेडकर नको ..गांधी हवा " धडा रिपीट करायला सांगत आहेत. सगळे "नाना "  त-हेने फुले शाहू आंबेडकरी मतदारांना भूलथापा देण्यात येत आहेत. परंतु लोक "पटोले" /पटवले जात नाहीत असेच चित्र आहे. 

सर्व "पृथ्वी" वर "राज" फक्त आपलेच आहे अशा तोर्यात कॉंग्रेस आहे.मिडीयात वंचित विरोधात एकटाच आरोळी फुंकणारा  "संजयला" आपलाच जय दिसतोय.मात्र वंचितांची परिस्थिती वेगळीच आहे."शरदाच्या" मनात चांदणे दिसत असले तरी प्रत्यक्षात " प्रकाश " चोहीकडेच पसरतोय. हे पाहून " उध्दवलाही " आपली खेळी उद्ध्वस्त झाल्यासारखी वाटतेय.

"खोबरकुटे" संपादक आणले. साता समूद्रापार " संग्राम " करून पाहिला. त्याच्या करवी खोटे मेसेजेस, क्लिप्स, व्हिडीओ सोशलमिडीयात नाचवत राहिले.

" प्रकाशासंगे " "कमळीचे" नाव जोडले. पण फायदा होत नाही पाहून थयथयाट सुरू आहे.लोकशाही, संविधानाच्या बद्दल लोकांच्या मनात अंधश्रद्धा पेरणारा पोटभरू "काळा दानव " ही उघडा पडला.

 देशीप्रेमी फ्रेंचकटवाला " चोवीस तास  वंचित विषयी " निखळ" खोटे भ्रम, संभ्रम फैलवणारा असभ्य आणि स्वतः ला " वेगळे " समजणारा बेगडी पाकीटबाज पत्रकार वंचितच्या सभांची अलोट गर्दी पाहून मदिराच्या गुत्त्यातून बाहेर फिरकायला तयार नाही. देशीचा "पावर " चढला की तिथेच मोठमोठ्याने शरद शरद - उध्दवा उध्दवा सारखे नाना त-हेचे पाकीटसाठी  धावे करत सुटतो.

ऐंशी।पंचाशी विचारजंतांची टोळी म्हणे, "वंचितला रोका" काय तर म्हणे " बौध्दांनी यावेळी निवडणूकीत ताकद दाखवण्याची गरज नाही ". कधी काळी नागपूरातून आंबेडकरांचे तिकीट घेऊन आमदारकीच्या निवडणुकीत " यशवंत " होऊन " मनोहर " स्वप्न रंगवणारा साहित्यिक डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला बेईमान होणार नाही असे वाटले होते. पण दुर्दैव !! 

कॉंग्रेसच्या "सुखात" आपला " देव" पाहणारा "थोरच" म्हणावा लागेल. काही "आठवले" नाहीत म्हणून काही पाठवले नाहीत. फुले शाहू आंबेडकरी लोकांनी तर आता काहींसाठी चक्क "कवाडेच" बंद केले आहेत.कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सालगडी, हरिभाऊंचे टोळक्यांच्या भेसूर रडण्यावर त्यांचे मालकच लाथा घालताहेत कारण सालगडी- हरिभाऊंचा कुठेच असर दिसत नाही. गवय्या "गवयीचे" सुर गळ्यातच अडकतात. मधातच सूर मोकळा होतो आणि "प्रकाशाचे" मधुर  गाणे गातो. 

भविष्यात उबाठाच्या खासदारकी,आमदारकीच्या अश्वावर बसायला नक्कीच मिळेल अशी "असीम " अंधश्रद्धा असलेले " सर "वदे काही कमी नाहीत. डरो मत म्हणायचे आणि लगेच "संविधान " बदलणार म्हणून डरवणारे मतलबी गल्लोगल्ली प्रचार करत फिरत आहेत.

कुणाला भिता ? कुणालाच नाही..!! अशी डरकाळी फोडणारा भिम सूर्याचा प्रकाशाची किरणे चौफेर उधळत आहेत. वंचित बहुजन नाहून निघत आहेत. तिसऱ्या चौथ्या फेज मध्ये "गोळवलकर नको,गांधी नको.. आंबेडकर हवेत हाच आवाज बुलंद होत आहे. 

हजारो लाखो वंचित बहुजन मुस्लिम आदिवासी ओबीसी दलित बांधव "आंबेडकरांना" ऐकण्यासाठी स्वतः च स्वतः ची भाजीभाकरी घेऊन, स्वतःच्या पैशाने फक्त सोशलमिडीयातील आवाहनावर "प्रकाश" वाटेवर  केवळ एकत्रच येत नाहीत तर वंचितच्या विजयाच्या अश्वावर आरूढ व्हायला येतात."अंजली माय " सुजान पिढीचा दमदार शिलेदार "सुजात" हजारोंच्या सभा गाजवतोय. विरोधकांनो "आंबेडकर" कुटुंबाचा जेवढा तुम्ही विरोध कराल तेवढा मुस्लिम आदिवासी दलित ओबीसी बहुजन वंचितांच्या एकजूटीच्या विजयाचा अश्व चौफेर उधळत आहे.उधळणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या