विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-लातुरचे 'नाॅन करप्ट' S.P. म्हणुन श्री.सोमयजी मुंडे हे ओळखले जात. व ते लातुर जिह्यात 'जाॅईन' होताच.सर्व अवैध धंद्याविरुध्द तसेच शहर हद्दीतील शाळा, काॅलेज व ट्यूशन एरियात पोलीसांचे "चार्ली पथक" तयार करुन "कोंम्बिंग आॅपरेशन" हे अभियान सुरु केले.व यामुळे शहरी भागातील शाळा,काॅलेज, ट्युशनच्या एरीयात "सडकछाप गॅंगची" धरपकड सुरु केल्याच्या बातम्या विविध पेपर व सोशल मिडिया मधुन वाचनात आले.माञ हंडरगुळी ता.उदगीर.जि. लातुर या ग्रामिण भागातील छोट्या गावात जेष्ठ व अपंग यांनी विचारणा केल्यास त्यांना अर्वाच्य भाषा वापरणा-या हाळीतील त्या सडकछाप टोळक्यावर कारवाई कधी करणार?असा सवाल जनतेतून चर्चीला जात आहे.हंडरगुळीत गल्लीबोळांमध्ये तसेच वडगाव पाॅईंट लगतच्या बसस्थानक परिसरात "हाळी" येथील कांही 'छप्परी' व 'सडकछाप गॅंग' ही सतत 'बाइक' वरुन फटाका सायलेंन्सर, व कर्णकर्कश हाॅर्न वाजवत हिंडताना दिसतात.अण् या 'छपरी टोळीचा" शिक्षण,नोकरी व बाजार निमित्य बाहेरगावी ये-जा करणा-या महिलावर्गांना सर्वाधिक ञास होतो.तरी पण आजवर या 'छपरी' पोरांच्या टोळीवर कुणीही कसलीही कारवाही केली नाही.आणि करु ही शकत नाही ! अशी कुजबूज बाईकवरुन सुसाट वेगात धिंगाणा करत हिंडणा-या त्या कांही '' छपरी पोरां " मध्ये सुरु आहे.तेंव्हा खरोखरच या गावात 'टिंगळटवाळी" करणा-या हाळीतील त्या 'छपरी पोरांवर' कारवाही होणार की नाही.जर होणार असेलतर कधी.असे सुज्ञ जनतेत बोलले जात आहे. कारण आज ग्रा.पं.असलेले हे गाव भविष्यात तालुका व न.प.होऊ शकतो.आणि भविष्यात सर्व संबंधित प्रशासनाला ञास होऊ नये म्हणुन अशा घटनांवर आता पासुनच आळा घालणे गरजेचे आहे.. तसेच सपोनी.भिमराव गायकवाड व पोउपनी.एम.के.गायकवाड व जमादार संजय दळवे हे जसे अवैध धंद्यावर कारवाई करतात ना तशी कारवाई हाळी - तील त्या "सडकछाप=छपरी" पोरांवर कधी करणार व या सडकछाप=छपरी गॅंगला *सुंदरी * चा हिसका कधी दाखवणार? असा सवाल महिलावर्गांचा आहे. हंडरगुळीतील अनेक गल्लीबोळात व शाळा,काॅलेज,बसस्थानक परिसरात हाळीतील कांही 'छपरी पोरं' सुसाट वेगात आणि फटाका सायलंन्सर वाजवित बाईक्स पळविताना व अनेकांना 'कट' मारताना दिसतात. तसेच या 'छपरी गॅंग' जवळ वेगवेगळे 'माॅडेल' ची विनानंबरची 'बाईक' येते कशी व कोठुन.कारण या पैकी कांही 'छपरी पोरांकडे' ना शेती,ना कोणता मोठा धंदा.तरीही दिड,दिड 2--2 लाख रुपयांची 'बाईक' उडवतात / वापरतात कशी.यापैकी एखादी विनानंबरची बाईक चोरीची असु शकते.अशी चर्चा जाणकार हाळी —हंडरगुळीकर करतात . तेंव्हा शहरी भागात शाळा,काॅलेज व बसस्थानक परिसरात चार्ली पथक दक्ष ठेवुन सतत कोम्बिंग आॅपरेशन राबविणा-या व सडकछाप, छपरी गॅंग ची धरपकड करणा-या कर्तबगार SP सोमयजी मुंडे पोलीस अधिक्षक लातुर यांनी उदगीर शहरानंतर तालुक्यात सर्वात मोठे व बाजारासाठी देशात सुप्रसिध्द असलेल्या हंडरगुळी या गावातील गल्लीबोळात व शाळा, बसस्थानक एरियात सतत दिवसराञी कर्णकर्कश हाॅर्न वाजवत हिंडणा-या हाळीतील कांही सडकछाप , छपरी टोळींवर कारवाहीचा हिसका व 'सुंदरी' चा 'प्रसाद' देण्याची गरज आहे. अन्यथा या लोफर , छपरी पोरांमुळे येथे सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी हंडरगुळी गावात व बसस्थानक तसेच बाजार पेठेत सतत स्टंटबाजी करणा-या लोफर गॅंगवर कारवाही करावी.अशी मागणी सुज्ञ हाळी- हंडरगुळीकर नागरिकांची आहे.विशेषत: या छपरी पोरांच्या ञासाला वैतागलेल्या भगीनींची विनंती आहे.. कर्तबगार पोलिसांना....


0 टिप्पण्या