रोशन चावरे चित्रा न्युज
अकोला :-केंद्र सरकारने अल्पसंख्याक शिष्यवृत्ती पाच धर्मासाठी बंद केली आहे . त्या मध्ये (१) बौद्ध धर्म (२) मुस्लिम धर्म (३)Christian धर्म (४) जैन धर्म (५) सिख धर्म या पाच धर्माचे विद्यार्थि विद्यार्थिनी करीता शिष्यवृत्ती २०२२ पासुन बंद करण्यात आहे.हा आकस केवळ धार्मिक अल्पसंख्याक असल्याचा असून NRC CAA लागू करताना पुढे ह्या अल्पसंख्याक धर्माचे काय होणार आहे त्याचा हा ट्रेलर आहे.त्यात बौद्ध धर्म आहे म्हणून तत्काळ ही बंदी घातली गेली असून अजूनही राज्याच्या अल्पसंख्याक खात्याचे वेबसाईट वर ही योजना दिसते मात्र अर्ज भरण्याची लिंक क्लिक केली असता ती ओपन होत नाही.
विशेष म्हणजे शिक्षण हक्क कायदा लागू असलेल्या वयोगट साठी ही बंदी आणली आहे, अर्थात पहिला वर्ग ते आठवी पर्यंत बंद करण्यात आली असून नवव्या वर्गापासुन सुरू आहे !
राईट टू एज्युकेशन ॲक्ट मध्ये केलेल्या चुकीच्या बदला मुळे जसा RTE कायदा संपविला आहे तसाच घाला अल्पसंख्याक शिष्यवृत्ती वर घालण्यात आला आहे.
0 टिप्पण्या