Ticker

6/recent/ticker-posts

अवकाळी पावसामुळे उडाली खामगावकरांची तारांबळ बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल भिजला



राकेश आसोले चित्रा न्युज 
बुलढाणा :-अवकाळी पाऊस बरसला अचानक आलेल्या पावसामुळे खामगावकरांची तारांबळ उडाली  तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेला शेतकऱ्यांचा माल सुद्धा या पावसामुळे भिजल्याचे दिसून आले. बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या मालासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसून येत आहे. खामगाव शहर व तालुक्यात सकाळपासून उन तापून मोठा उकाडा जाणवत होता. दरम्यान सायंकाळी पाच वाजेपासून अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे शहरातील नागरिक आणि व्यवसायिकांची तारांबळ उडाली होती. जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस कोसळला. या अवकाळी पावसाचा फटका येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनाही चांगलाच बसला आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुंग, तूर, मका, ज्वारी, सोयाबीन धान्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी आणलेला माल जोरदार अवकाळी पावसामुळे भिजल्याचे दिसून आले. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी धावपळ करून कसा बसा त्यांचा माल सुरक्षित झाकून ठेवला. मात्र पाऊस जोरात आल्याने काही मालाचे नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या