Ticker

6/recent/ticker-posts

अकलूज माळेवाडीमधील पाणीटंचाई त्वरित दूर करा


पीपल्स रिपब्लिकन पार्टी आंदोलनाचा इशारा
 
रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
सोलापूर:- अकलूज माळेवाडी या भागामध्ये गेली महिन्याभरापासून तीव्र पाणीटंचाई असल्याने ती पाणीटंचाई त्वरित दूर करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे बाबतचे लेखी निवेदन पीपल्स रिपब्लिकन पार्टी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी अकलूजचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
गेली महिनाभरापासून अकलूज माळेवाडीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असून नगरपरिषदेचा पाणीपुरवठाही पाच दिवसाआड करण्यात आला आहे अकलूजमधील काही भागांमध्ये मोठमोठे खड्डे घेऊनही पिण्याचे पाणी नागरिकांच्या नळाला येत नसल्याच्या तक्रारी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांकडे करूनही नागरिकांच्या नळाला पाणी आले नाही. अकलूज माळेवाडी नगरपरिषद अंतर्गत असणाऱ्या पाण्याच्या बोरवेल ही ग्रामपंचायत काळातील जुन्या बोरवेल असून त्या बोरवेलचे पाणीही बंद होऊन बोरवेल बंद पडल्या आहेत. अकलूज नगरपरिषदेची जबाबदारी असतानाही नागरिकांना पाणी दिले जात नाही नागरिकांनी पाणी टँकरची मागणी करूनही संबंधित विभागाचे अधिकारी नागरिकांना वेळेत पाणी टँकर उपलब्ध करून देत नाहीत त्यामुळे गोरगरीब हातावरचे पोट असणारे सर्वसामान्य नागरिकांनाही पैसे देऊन विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने खाजगी पाणी टँकर मार्फत गोरगरीब नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू आहे ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू असून यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत त्यामुळे पाणीटंचाई निर्माण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून अकलूज माळेवाडी मधील प्रत्येक नागरी वसाहतीमध्ये नव्याने बोरवेल कनेक्शन घेऊन त्या त्या भागातील पाणीटंचाई त्वरित दूर करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान सहसंपर्कप्रमुख रोहिदास तोरणे युवक तालुका सरचिटणीस तुषार केंगार अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे रियाज बागवान आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या