सचिन चौरसिया चित्रा न्यूज
रामटेक :- १ मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन सर्व राज्यभर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो त्यात स्नेह सदन मतीमंद मुलाची विशेष शाळा शितलवाडीत मुख्याध्यापक पंकज पांडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व ध्वजारोहण करून राज्यगीताने संपन्न झाला. यावेळी शाळेच्या वतीने सर्वाना कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्या देण्यात आल्या. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक प्रविण महल्ले, सविता अतकर, प्रिया दुबे, प्रीतम मानकर, प्रदीप बागडे, किश्वर शेख,अशोक पातोडे, कर्मचारी सविता ढबाले, सुनिता मसराम, मोनिका सांगोडे, सचिन झाडे, अश्विनी वानखेडे, मिनाक्षी वाघधरे, मोहन बागडे, नितीन खेवले, अमन दिक्षित, विशाल भाजीपाले, अतुल घोडाकाडे सह इतर कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या