Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीच्या आठवडी बाजारात भाज्यांचे दर वाढले तर महिलांचेबजेट कोलमडले .....

 विठ्ठल पाटील चित्रा न्युज 
लातूर :-या वर्षी मार्च पासुनच उन्हाचे चटके तिव्रस्वरुपात बसू लागल्याने भुजल पाणी पातळी खालावली.आणि याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाला म्हणुन येथील आठवडी बाजार मध्ये सर्व भाज्यांची आवक घटल्याने दर वाढल्याचे समजते.तर या वाढीव दरांमुळे महिलांची कॅश बॅंक तत्काळ रिकामी होत आहे.अशी चर्चा महिला वर्गातुन ऐकू येत आहे..
हंडरगुळी ( ता.उदगीर )च्या आठवडी बाजारात ताजा,टवटवीत भाजीपाला मिळतो म्हणुन दर रविवारच्या बाजार दिवशी परिसरातील 50 / 60 गावचे नागरिक 8 दिवसांचा भाजीपाला व अन्य बाजार खरेदी करण्यासाठी येथे गर्दी करतात.येथील भाजीपाल्याचा बाजार हा स.9 ते राञी 7 वा.पर्यंत 4 लांबचलांब लाईनीत भरत असतो.दि. 19 च्या बाजारात फेरफटका मारला असता भाज्यांची आवक कमी आणि दर वाढल्याचे चिञ होते.याचे कारण जाणुन घेतलो असता,यंदा मार्च सुरु होताच उन्हाची तिव्रता वाढली.म्हणुन पाणी पातळी खालावली.भाजीपाला लागवड घटली.म्हणुन येथील ८ वडी 
बाजारात हिरवी मिरची २० ₹ पाव, टोमॅटो ३० ₹ किलो,कांदे २० ₹ कि. बटाटे २० ₹ कि.लसुन १६० ₹ किलो, अद्रक ४० ₹ पाव,कोथिंबीर १० जुडी चवळी,मटकी,वरणा १० ₹ पाव,फुल कोबी २० ₹ नग,काकडी ८० ₹ किलो यासारखा दर भाजीपाल्यांचा होता.
छ.शिवाजी महाराज चौक ते चंदर माचेवाड याच्या घरापर्यंत ४ लाईन मध्ये भरणा-या बाजारात भाजीपाला घेण्यासाठी स.१० ते राञी ७ पर्यंत इतकी गर्दी असते की,या गर्दीतुन ये-
जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.कारण ताजा,टवटवीत भाजीपाला मिळत असल्याने पन्नास एक गावातील जनतेसह हाॅटेलवाले एकदाच ८ दिवसाचा बाजार भरतात. माञ सध्या भाज्यांची आवक घटली असल्याने किंम्मत वाढली आहे.तसेच वाढत्या उन्हासह भाज्यांची कमतरता निर्माण झाल्याने बाजार कांहीसा पातळ व गर्दी तुरळक दिसत होती.. 
***********————********* 
मापात पाप होत असल्याची आणी वजन मापे यंञणा बेपत्ता झाल्याची चर्चा .. 
***************************
 हंडरगुळी येथील आठवडी बाजार हा
राज्यासह देशात प्रसिध्द आहे.त्यात सध्या गुरांच्या बाजारचा सांगता समारोप जवळ आला असलातरी ही
फळ,भाजीपाला,भुसार आदींचा बाजार जोमात आहे.माञ बहूतांश माळवं विक्रेत्यांकडे ईलेक्ट्रिकल्स वजन काट्या ऐवजी जुने तराजुच आहेत.आणि यात लोखंडी बाट/मापं यांचेऐवजी दगडांचा वापर सर्रासपणे होताना दिसतो.आणी या दगडी मापा मधून वजनात घट होऊन माल कमी येत असल्याची म्हणजेच मापा मध्ये पाप होत असल्याची चर्चा बाजारात ग्राहकांतुन होत आहे.तसेच वजनाचे जुने तराजु व कांही प्रमाणात असले ले लोखंडी माप.यांची वजन मापे यंञणेकडून तपासणी करुन त्यावर शिक्के मारल्याचे दिसत नाही.म्हणुन संबंधित यंञणा या गावासाठी नियुक्त केलेली नाही.म्हणुनच दगडी वजनांचे माप मोठ्याप्रमाणात सर्रासपणे या ठिकाणच्या रविवारच्या ८ वडी भाजी पाला बाजारात वापरले नसते.
एकीकडे वाढती महागाई तर दुसरी- कडे मापात पाप.यामुळे सामान्य , गरीब,मजुरवर्ग भरडला जात असुन, संबंधित यंञणेच्या आर्शिवादामुळेच दिवसा-ढवळ्या मापात पाप होतेय.!
तेंव्हा संबंधित वरिष्ठ अधिका-यानी याकडे लक्ष घालुन मापात पाप करुन स्वत:चा खिसा भरणा-यावर आणि ग्राहकांच्या खिश्यावर डल्ला मारणारे विक्रेत्यांवर कारवाही करावी .....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या