Ticker

6/recent/ticker-posts

दंगलखोर गुन्हेगार साजिद खान पठाण विरोधात वंचितच्या महानगर महासचिव गजानन गवई ह्यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.


रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
अकोला - दंगलखोर गुन्हेगार साजिद खान पठाण ह्याने मौलाना हाफीज नजीर रा. अवेस करणी मस्जीद, खैर मोहम्मद प्लॉट ह्यांना केलेली अश्लील शिवीगाळ आणि जातीय तेढ निर्माण करून दंगल भडकवण्याचा कट रचला वरून वंचितच्या महानगर महासचिव गजानन गवई ह्यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.त्यावरून पोलिसांनी अप. क्र.०२३४/ २०२४ नुसार दिनांक
१५/०५/२०२४ रात्री अकरा नंतर भारतीय दंड संहिता १८६० नुसार १५३- (अ), १२०- (ब), २९५-(अ),५०४ साजीद खान मन्नान खान रा. फिरदोस कॉलनी, अकोला विरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
साजिद पठाण ह्याने मौलाना हाफिज नजीर यांना त्यांचे मोबाइल वर फोन लावुन अश्लील भाषा वापरून शिवीगाळ केली होती, 'तेरी मा की चुत बहोत राजकारण कर रहा तु और आंबेडकर को सपोर्ट कर रहा तु और तेरा आंबेडकर क्या तुर्रमखा है और उसके सब भारीप बालो को मेरे सामने बुला, मै सबको दीखाता,क्या उखाडते तो में देखता. उनके म की चुत उनको देखता अब मे, अशी अश्लील भाषा वापरत मुस्लिम धर्मगुरू ह्यांना शिवीगाळ करून बौध्द व मुस्लिम समाजात जातीय तेढ निर्माण करूण दंगल घडविण्याच्या उददेशाने षडयंत्र केले होते.सदरची ऑडीओ क्लीप ही दिनांक १३/०५/२०२४ रोजी व्हायरल झाली होती.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस कार्यकर्ता साजिद पठाण विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली होती.सदर वादग्रस्त रेकॉडींग गजानन गवई ह्यांनी दि. १५/०५/२०२४ रोजी श्रीवास्तव चौक डाबकी रोड अकोला येथे हजर असतांना स्वताच्या मोबाईलवर ऐकली आणि पक्षाचे वतीने फिर्याद दिली. विशेष म्हणजे यापुर्वी सुध्दा साजीद खान यांनी अशाच प्रकारे कट रचून अकोला शहरात हिंदु मुस्लिम समाजाच्या लोकांमध्ये दंगल घडवली होती. ज्या दंगली मध्ये गायकवाड नामक व्यक्तीचा जिव गेला होता. त्या दंगली संबंधाने साजीद खान मनान खान यांचे विरुध्द पो.स्टे. रामदास पेठ येथे गुन्हा दाखल असुन सदर दंगली संबंधाने पो.स्टे. जुने शहर येथे सुध्दा गुन्हे दाखल आहेत. तसेच दिनाक २९/०४/२०२४ रोजी हमजा प्लॉट येथील सैयद रेहान नामक व्यक्तीने मौलाना हाफीज नजीर यांची साजीद खान मुत्रान खान याचे सांगण्या वरूण व्हाट्स अॅप ग्रुपवर बदनामी केली होती. त्या बाबतची तक्रार सुध्दा पो.स्टे. डाबकी रोड येथे दाखल आहे, सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून जातीय धार्मिक तेढ निर्माण करणे, शिवीगाळ करून दंगल उसळविने, जिल्हात आणि राज्यात तणाव निर्माण करणे, असे प्रकार तो सातत्याने करीत असतो.त्यामूळे साजीद खान ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे काँग्रेसी कार्यकर्त्याने नेहमीच दोन विजातीय जाती मध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केले आहे. यावेळी सुध्दा साजीद खान ह्याने सैयद रेहान रा. हमजा प्लॉट यांचे सोबत मिळुन कट कारस्थान केले आहे. अशा घटनांना आळा घालण्या करीता पठाण विरुध्द कलम  १५३- (अ), १२०- (ब), २९५-(अ),५०४ भादवि प्रमाणे गुन्हे दाखल करण्यास करीता तक्रार गजानन गवई यांनी दिली होती.त्यानुसार दाबकि
 रोड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ०२३४/ २०२४
१५/०५/२०२४ भारतीय दंड संहिता १८६० नुसार १५३- (अ), १२०- (ब), २९५-(अ),५०४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरोपीला तत्काळ अटक करून त्याचे विरुद्ध संघटित गुन्हेगारी कायदा नुसार त्यास तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडी जिल्हा आणि महानगर पदाधिकारी ह्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या