राकेश आसोले चित्रा न्युज
शहादा: नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी आपला बिरसा फायटर्सचा जाहीरनामा नुकताच जाहीर केला.रोजगार उपलब्ध करून देणार, मोठ्या प्रमाणात होणारे मजूरांचे स्थलांतर रोखणार, नवीन उद्योग, कारखाने,सुतगिरण्या,MIDC आणणार, बंद कारखाने व सुतगिरण्या चालू करणार. सर्वच समाजातील लोकांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य इत्यादी सर्वच विषयांवर समानतेने काम करणार. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देणार, शाळांचे व सरकारी क्षेत्रांचे खाजगीकरण रोखणार.
रस्ते खड्डेमुक्त करणार, नवीन रस्ते बनवणार.भ्रष्टाचार मुक्त करणार ,भ्रष्टाचार रोखणार.व्यसनमुक्त करणार.
कुपोषण मुक्त करणार, प्रत्येक गांवात सरकारी दवाखाना सुरू करणार,दवाखान्यात मोफत उपचार उपलब्ध करून देणार. नर्मदा नदीचे पाणी सिंचनाखाली, शेतीसाठी आणणार ,नर्मदा वळण धरणापासून गांवांचे नुकसान रोखणार.अल्पसंख्याकांसंबंधित शिक्षण,रोजगार, पेन्शन इत्यादी सर्वच प्रश्न सोडवणार.
विद्यार्थांची DBT योजना बंद करणारशेतक-यांच्या मालांना हमीभाव मिळवून देणार,कर्ज माफ करणार.५ वी,६ वी अनुसूची व पेसा कायद्याची १०० टक्के अंमलबजावणीसाठी भाग पाडणार .वनदावे १०० टक्के मंजूर करणार .
पेट्रोल, डिझेल, गॅस स्वस्त करण्यास भाग पाडणार .मोफत वीज देणार,राहिलेल्या भागांत विद्युतीकरण करणार. महिलांना उद्योगांद्वारे रोजगार उपलब्ध करून देऊन सक्षमीकरण करणार, बचत गटांना प्रशिक्षण देणार .सरकारी क्षेत्रातील रिक्त पदे भरणार,कंत्राटीकरण बंद करून सेवेत कायम करणार. गरीबांसाठी मोफत घरकुले बांधणार .दिव्यांगांना, अपंगांना सरकारी योजनांत प्राधान्य देणार .वद्धांना व तृतीयपंथांना अनेक योजनांचा लाभ मिळवून देणार. पर्यटन क्षेत्रांचा विकास करणार .प्रत्येक गांवात वाचनालय उभारणार .प्रत्येक तालुक्यात सांस्कृतिक समाजभवन बांधणार .भारतीय क्रांतीकारकांचे पुतळे व स्मारके बांधणार. गरजूंना मोफत रेशन देणार.झोपडीमुक्त शाळा करणे.इत्यादी एकूण २७ विषयांचा समावेश आहे.काँग्रेस व भाजपच्या जाहीरनाम्यात नंदूरबार लोकसभाश्रॆत्राच्या विकासासाठी एकही मुद्दा नसल्यामुळे बिरसा फायटर्सचा जाहीरनामा सरस मानला जात आहे.
0 टिप्पण्या