भंडारा:-नेहरू बालसंस्कार वर्ग भंडारा मेंढा वस्ती येथे नुकतेच प्रांत बालसंस्कार प्रमुख सौ. अनुराधा ताई माने ह्यांनी सीता नवमी कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले होते.......
बालसंस्कार वर्गात नेहमीच,मुलांवर चांगले संस्कार व्हावेत ह्या दृष्टीने चांगल्या बोधपर कथा कथन केल्या जातात *..रामायण कथा* सुद्धा बालकांना सांगण्यात आल्यामुळे रामायणातील सगळे आदर्श व्यक्तिमत्त्व ह्यांचा परिचय मुलांना होताच....आणि त्यामुळेच छोटी छोटी सगळी बालक अती उत्साहाने...वेगवेगळी पात्र वेशभूषा करून अतिथी समोर आलेत.खरोखरच खूपच कौतुक वाटले. *सीता नवमी* निमित्ताने राम सीता वरील गाणे ,भजन,कथा सांगण्यात आल्या.
कार्यक्रमात प्रामुख्याने विदर्भ प्रांत संयोजिका कांचन ताई ठाकरे,भंडारा गोंदिया विभाग प्रमुख दिपा ताई नायर, नैतिक मूल्य शिक्षण प्रमुख मेघा ताई एकापुरे, कार्यकर्ता अनिता ताई महाजन इत्यादी अतिथी गन उपस्थित होते. प्रत्येकाने आपापल्या वक्तृत्व शैलीने सीता माते विषयी माहिती देऊन ती कशी आदर्श माता, आदर्श पत्नी होती हे अनेक उदाहरण देऊन समजावून सांगितल्यामुळे मुलांना सीता माता कळण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अनुराधा माने ह्यांचे असले तरी त्यांनी बालकां कडून करवून घेतले.ह्या कामात श्रीमती सुनंदा ठाकरे, आरती मते, कविता कृपाले व माधवी ओघारे ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.
0 टिप्पण्या