Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया पोलीस पथकाची कामगीरी


तिरोडा शहरात एकाच रात्री ४ दुकाने फोडणारी टोळी गजाआड-,स्थानिक गुन्हे शाखा, पथकाने ४ गुन्हेगारांना नागपुर येथुन तर एकास तिरोडा येथुन जेरबंद करून ठोकल्या बेडया-- मुद्येमाल हस्तगत--

प्रवीण शेंडे  चित्रा न्यूज 
गोंदिया -तिरोडा दिनांक- १७/०५/२०२४ चे रात्री २१.३० वा तें दि.१८/०५/२०२४ चे ०७.०० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोररटयांनी मौजा गंज बाजार तिरोडा येथील ४ ते ५ दुकानांचे शटर तोडून किराणा दुकान, मेडीकल दुकानातील गल्लयातील चिल्लर व नगदी चोरून नेल्याने फिर्यादी श्री. संजय मेटवानी रा. कंवरराम वार्ड, तिरोडा यांचे तक्रारी वरून पो. ठाणे तिरोडा येथे अप.क्र. ३२०/२०२४ कलम ३८०, ४५७ भांदवि प्रमाणे दाखल करण्यात आले होते.

          तिरोडा शहरात एकाच रात्री चोरटयांनी ४ ते ५ दुकाने फोडल्याने शहरातील व्यापार वर्गात चोरटयांचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मा. वरीष्ठांनी तिरोडा शहरातील घडलेल्या चोरी प्रकरणाचे गांर्भीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखा पथकास, तसेच पोलीस ठाणे तिरोडा पोलीसांना सदर गुन्हयातील चोरट्यांचा शोध घेवून गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हयात तात्काळ अटक करण्याबाबत निर्देशित केले होते.

           या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी, श्री साहिल झरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो . नि. श्री.दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना घटनास्थळ शेजारी तसेच तिरोडा शहरात लागलेले सीसीटिव्ही फुटेज ची तपासणी केली असता प्राप्त सीसीटिव्ही फुटेज आणि प्राप्त गोपनिय बातमीदार यांचे माहीती वरून सदर गुन्हयातील चोरटे यांनी एका काळया रंगाच्या मारूती अल्टो गाडीचा वापर केल्याचे दिसून आल्याने संदर संबंधात अधिक माहीती प्राप्त करून शोध केला असता सदरची गाडी ही भारत कंटेनर्स कंपनीचे युनीट १ चे गेट क्र.१ चे बाजुस नागपुर येथे उभी असल्याची माहीती प्राप्त झाल्याने पोलीस पथकाने पो. ठाणे हिंगणा एमआयडीसी नागपुर येथे जावून तेथील पोलीस स्टॉफ चे मदतीने सदर गुन्हयात वापरलेली गाडी क्र. एम.एच. ३१ सीएम-६४३२ ही भारत कंटेनर्स कंपनीचे युनीट १ चे गेट क्र.१ चे बाजुला उभी असल्याचे दूिन आल्याने कंपनीचे वॉचमैन यांस गाडीबाबत सखोल विचारपुस केली असता सदर कंपनीत काम करणारे नमूद गाडीचे मालक *आरोपी नामे-- १) रविकांत दयानंद गोंड वय ३७ वर्षे रा. प्लॅट न.९३ पी.एन. नायडू इंडस्ट्रियल एरीया नागलवाडी ता. हिंगणा नागपुर* यांस ताब्यात घेवून तिरोडा येथे गुन्हयात त्याच्या गाडीचा झालेला वापर व गुन्हयासंबंधात सखोल विचारपुस केली असता सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली. विश्ववासात घेवून त्यास पुन्हा गुन्हयासंबंधाने विचारपुस चौकशी केली असता त्याने त्याचे *मित्र सोबती आरोपी नामे--* 

२) महेश बालाराम दुरूगकर वय ४४ वर्षे रा. मुकेश किराणा जवळ निलडोह नागपूर
 
३) नागेश हिरामण तिजारे वय २३ वर्षे रा. अमरनगर, ता. हिंगणा, नागपूर,

४) समीर प्रमोद गडपायले वय २४ वर्षे रा. वानाडोंगरी नागपुरअसे मिळुन तिरोडा येथील त्यांचा मित्र आरोपी नामे

 ५) रियाज ऊर्फ राजा रमजान कुरेशी वय २४ वर्षे रा. नेहरू वार्ड तिरोडा* व 

फरार आरोपी नामे-६) सौरभ गजभिये रा.जुनी वस्ती तिरोडा यांचे सांगणेप्रमाणे तिरोडा येथे चोरी करण्याचे ठरल्याचे व ठरल्याप्रमाणे तिरोडा येथे जावून दुकानाचे शटर तोडून चोरी केल्याचे यातील आरोपी क्र. १ ते ५ यांनी सांगुन कबुल केले आहे. आरोपीतांचे ताब्यातून *गुन्हयात वापरलेली मारूती अल्टो कंपनीचे चारचाकी वाहन, गुन्हयात चोरलेली रक्कम रूपये २९९०/-रूपये गुन्हयात हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे* . आरोपी क्र. १ ते ५ यांना गुन्हयात जेरबंद करून तिरोडा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपीतांना गुन्हयात अटक करण्यात आलेली असुन पुढील कायदेशिर कारवाई तिरोडा पोलीस करीत आहेत.

                याच आरोपीतांनी काही दिवसा पूर्वी  बालाघाट येथे सुद्धा अश्या प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे...

        सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यांनद झा, यांचे निर्देशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी. तिरोडा श्री. साहिल झरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनांत पोउपनि महेश विघ्ने, पोलीस अंमलदार पोहवा सुजित हलमारे, इंद्रजित बिसेन, दुर्गेश तिवारी, पोशि संतोष केदार, चापोशि घनश्याम कुंभलवार स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या